कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात
29953
कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा
कोल्हापूर ः येथील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा झाली. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील अध्यक्षस्थानी होते. पालकांनी स्वतःची भूमिका जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे. पालक हा पाल्य व शिक्षक यांच्यातील दुवा होणे गरजेचे आहे. पालक व शिक्षकांनी मुलांच्या मनातील अंत:प्रेरणा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. हे केवळ सहकार्य व समन्वयातूनच शक्य असल्याचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका, पालक म्हणून कोणती कर्तव्य आहेत आणि ती कशाप्रकारे बजावली पाहिजेत याबाबत ज्युनिअर विभाग प्रमुख बी. डी. डवंग यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा व मूल्यमापन पद्धती याविषयी एम. पी. वंडकर यांनी मार्गदर्शन केले. संयोजन ए. व्ही. पाटील यांनी केले. एम.पी. कोगेकर, जी. एन. धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. आर. एम. कुंभार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.