एसटी महामंडळ

एसटी महामंडळ

Published on

रेल्वेच्या संकेतस्थळावर
आता एसटीचेही आरक्षण
कोल्हापूर, ता. १४ ः एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनही घेता यावा यासाठी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कार्पोरेशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करारावर सह्या केल्या. त्यामुळे रेल्वे व एसटी अशा जोडून प्रवासासाठी रेल्व कार्पोरेशनच्या संकेतस्थळावरही आरक्षण करता येणार आहे.
रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन ‘रेल्वे’च्या संकेतस्थळावर तिकिटांचे आरक्षण करतात. या सर्व प्रवाशांना एसटीचे आरक्षण याच संकेतस्थळावर करता येणार आहे. रेल्वे प्रवास संपल्यानंतर ज्यांना पुढचा प्रवास एसटीने करायचा आहे त्यांना एकाच संकेतस्थळावर रेल्वे व एसटीचे तिकीट आरक्षण करता येईल. त्यामुळे रेल्वे व एसटीचा संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. या सामंजस्य कराराच्यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, रेल्वे कार्पोरेशनच्या सीमा कुमार उपस्थित होत्या.
-----
गौरी गणपतीसाठी
२२० जादा बस

कोल्हापूर, ता. १४ : यंदाच्या गौरी गणपती सणासाठी एसटी महामंडळाने २२० जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार या जादा गाड्या विविध बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
गावी येणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ दरवर्षी कोकण मार्गावर जादा गाड्या सोडते. त्यानुसार मुंबई व ठाण्यातून पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगाव या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पुणेतून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची सुविधा आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानक, इचलकरंजी अशा महत्त्‍वाच्या बसस्थानकावरून इस्लामपूर, सांगली, मिरज, निपाणी, बेळगाव, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत तर प्रवाशांना ई तिकीट आरक्षण सुविधेचा लाभ घेत प्रवास करावा, असे आवाहनही बारटक्के यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.