बालाजी विद्यामंदिरमध्ये झिम्मा फुगडी

बालाजी विद्यामंदिरमध्ये झिम्मा फुगडी

Published on

ich204.jpg
32025
इचलकरंजी : झिम्मा-फुगडी खेळाचा आनंद मुलींनी घेतला

बालाजी विद्यामंदिरमध्ये झिम्मा-फुगडी
इचलकरंजी : बालाजी विद्यामंदिरमध्ये मुख्याध्यापिका मंजूषा रावळ यांनी झिम्मा-फुगडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नववी व दहावीमधील सात गटांनी सहभाग घेतला होता. मंगळागौरीवर आधारित विविध गीते, फुगडी, झिम्मा, घागर घुमवणे, सूप नाचवणे, उखाणे आदी प्रकार सादर केले. स्पर्धेमध्ये दहावी क या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. नववी क द्वितीय, तर दहावी ब तृतीय आले.
-------------------
चंदूरमध्ये पकडली तीन फूटी घोरपड
इचलकरंजी : चंदूर शाहूनगर येथे साडेतीन फूट लांबी असलेली घोरपड पकडण्यात प्राणिमित्रांना यश आले. येथील खुशबू एंटरप्रायजेस कारखान्यामधील कर्मचाऱ्यांना घोरपड फिरताना निदर्शनास आली. त्यांनी छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे प्राणिमित्र आकाश कारवेकर यांना माहिती दिली. महंमद कनवाडे यांच्या सोबतीने तिला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
----------------------------

साई स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस
इचलकरंजी : साई इंग्लिश स्कूलमध्ये बालवाडी विभागाचा आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा केला. नातवंडांच्या हस्ते आजी-आजोबांचे पाद्यपूजन केले. आजी-आजोबांसाठी विविध खेळ आयोजित केले होते. मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर, मिलिंद कांबळे, सविता कांबळे, दीप्ती सातपुते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.