Kolhapur: रविवारी अंबाबाई मंदिरात पर्यटकांची गर्दी, मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : रविवारची साप्ताहिक सुट्टी साधत कोल्हापुरात पर्यटकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव येथून आलेल्या भाविक, पर्यटकांमुळे अंबाबाई मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पर्यटकांनी अंबाबाईच्या दर्शनासह जोतिबा, पन्हाळासह जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. पर्यटकांमुळे शहरातील सर्वच व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल झाली.
दरम्यान, अंबाबाईच्या दर्शनानंतर पर्यटकानी रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. रंकाळा तलावावर पर्यटकांसह बालचमूंनी खेळाचा आनंद लुटला. त्यानंतर टाउन हॉल वस्तुसंग्रहालय, क्रांती उद्यान, न्यू पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांचे वस्तुसंग्रहालय पाहण्यास पर्यटकांनी पसंती दिली. जोतिबा डोंगरावर भाविकांनी दर्शन घेत पन्हाळगडावर पर्यटनाचा आनंद लुटला. परतीच्या मार्गावर असताना काहींनी नृसिंहवाडीला दत्त दर्शन घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.