रेशन धान्य दुकान संप बातमी

रेशन धान्य दुकान संप बातमी

Published on

रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य वितरण ठप्प
नागरिकांचे हाल : ५०० टन धान्य दुकानातच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः रेशन दुकानदारांनी फोर जी ई पॉस मशिन मिळावे, या मागणीसाठी संप सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी रास्तभाव धान्य दुकाने आजपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच संप पुकारल्याने रेशनचे वितरण थांबले असून ३०० टन तांदूळ व २०० टन गहू असे ५०० टन धान्य वितरण ठप्प झाले. रेशनवरच अवलंबून असणाऱ्या नागरिकांना याचा नाहक फटका बसत आहे.
जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शहरासह आपसासच्या ग्रामीण भागातील दुकानांमध्ये भेट दिली. दरम्यान, मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर पुरवठा अधिकारी प्रज्ञा कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये रेशनमधील कालबाह्य प्रचलित नियम बदलून त्वरित नवीन नियम करावेत, १५० रुपये मार्जिन मनीमध्ये वाढ करून ३०० रुपये मार्जिन मनी मिळावा, मासिक इन्कम गॅरंटी ५० हजार रुपये मिळावेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ लाभार्थ्यांचे पात्रता निष्कर्ष त्वरित बदलावेत, आनंदाचा शिधा योजना कायमस्वरूपी राबवून यामध्ये पामतेलाऐवजी सोयाबीन किंवा सुर्यफूल तेल द्यावे, ‘नाफेड’मार्फत ‘भारत ग्रँड’ रेशन दुकानांमध्ये कांदा, तूरडाळ, चणाडाळ, मूगडाळ आदी वस्तू उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, संपामुळे जिल्ह्यातील १६७० रेशन दुकाने दिवसभर पूर्णपणे बंद राहिली.
आंदोलनात राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, गजानन हवालदार, दीपक शिराळे, दिनकर पाटील, संदीप पाटील, श्रीपती पाटील, संदीप लाटकर, विलास देशपांडे, बाबासाो भुयेकर, पांडुरंग सुभेदार, नयन पाटील आदी सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.