Selling Sugar
Selling Sugaresakal

Sugar Factory : 90 टक्के साखर विक्रीची सक्ती; केंद्र सरकारचे कारखान्यांना आदेश, चुकीची माहिती येत असल्याचा संशय

काही कारखाने इनव्हाईसमध्ये साखरेचे वजन लिहिताना क्विंटल, पॅकेट, बॅग, बॉक्स असे नमूद करतात, ही बाबही चुकीची आहे.
Published on

कोल्हापूर : कारखान्यांना (Sugar Factory) ठरवून दिलेला साखर विक्रीचा कोटा आणि प्रत्यक्ष विक्री यात काही कारखान्यांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने यापुढे कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या महिन्याच्या साखर विक्री कोट्यातील किमान ९० टक्के साखर विक्री (Selling Sugar) करणे बंधनकारक असल्याचे आदेश केंद्र सरकारने (Central Government) काढले आहेत.

Selling Sugar
APL, BPL रेशन कार्डांबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट; अन्न-नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, 5 किलो तांदळाचे पैसे..

बाजारातील साखरेचे दर स्थिर राहावेत, त्यात वाढ होऊ नये किंवा जादा साखर बाजारात आली तर दर कोसळू नयेत, यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक कारखान्यासाठी महिन्याला किती साखर विक्री केली पाहिजे याचा कोटा निश्‍चित केला आहे. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला त्यांच्या उत्पादित साखरेनुसार हा कोटा दिला जातो; पण काही कारखाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विकतात; पण केंद्र सरकारला माहिती कळवताना दिलेल्या कोट्याएवढीच साखर विक्री केल्याची माहिती कळवतात. ही बाब अत्यावश्यक वस्तू कायदा व साखर नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा आहे.

Selling Sugar
कर्नाटकचा विक्रमी अर्थसंकल्प सादर; सिद्धरामय्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय-काय दिलं, किती कोटींची केली तरतूद?

जर बाजारात मागणी नसेल व ९० टक्के कोटा खपणार नसेल तर तसे केंद्र शासनास कळवणे आवश्‍यक आहे. त्यातून हा कोटा अन्य साखर कारखान्यांना वितरीत करता येईल, असे या आदेशात म्हटले आहे. साखर विक्रीबाबतची माहिती ज्या त्या महिन्यात प्रोफार्मा-२ व न्यूज पोर्टल जीएसटीआर-१ यावर ऑनलाईन पाठवावी लागते. यामध्ये झालेली साखर विक्री व त्यावर भरलेला जीएसटी, प्रत्यक्ष कारखान्याबाहेर गेलेली साखर अशी सविस्तर माहिती नमुन्यात देण्याचे बंधन आहे.

या माहितीच्या आधारे चुकीची माहिती दिल्यास ती तत्काळ खाद्य मंत्रालयाच्या संबंधित विभागास जीएसटी रक्कम व विक्री झालेली साखर याचा मेळ घातल्यावर लगेच समजून येते. काही कारखान्यांच्या बाबतीत हे घडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा नवा आदेश जारी केला आहे.

Selling Sugar
Nilesh Rane : भास्कर जाधवांची चिपळूणमधील भाईगिरी संपवणार; राड्यानंतर नीलेश राणेंचा गर्भित इशारा

काही कारखाने इनव्हाईसमध्ये साखरेचे वजन लिहिताना क्विंटल, पॅकेट, बॅग, बॉक्स असे नमूद करतात, ही बाबही चुकीची आहे. ही नोंद टनामध्येच करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. या चुकांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित कारखान्यांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा या आदेशात देण्यात आला आहे.

‘या निर्णयाने आता कारखान्यांना साखर विक्रीबाबत व त्याच्या लिखापढीबाबत अत्यंत जागरूक रहाणे जरूरीचे आहे. या आदेशामुळे होणाऱ्या बेकायदेशीर बाबींना निश्चितच आळा बसणार आहे.

-पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.