Sharad Pawar Satej Patil
Sharad Pawar Satej Patilesakal

शाहू महाराजांबाबत सर्व सकारात्मक? पवारांची डिनर डिप्लोमसी, सतेज पाटलांच्या घरी जमली नेत्यांची मांदियाळी

देशात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांची मोठी पसंती आहे.
Published on
Summary

'देशात आणि महाराष्ट्रात भाजपसह महायुती सरकारच्या मनमानीला लोक कंटाळले आहेत.'

कोल्हापूर : ‘देशात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांची मोठी पसंती आहे. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेनेसह (शिंदे गट) कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदारांबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून देईल तो उमदेवार निश्‍चितपणे विजयी होईल’, अशी माहिती जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना दिली.

Sharad Pawar Satej Patil
अतिआत्मविश्वासानेच आपला घात झाला, मागील चुका पुन्हा करून चालणार नाहीत; असं का म्हणाले राजू शेट्टी?

कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासह श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा, राष्ट्रीय सचिव भालंचद्र कांगो, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांचे स्नेहभोजन झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी चर्चा केली.

Sharad Pawar Satej Patil
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकरच सुटणार? राज्यपालांच्या 'त्या' विधानामुळे तोडगा निघण्याची शक्यता!

‘देशात आणि महाराष्ट्रात भाजपसह महायुती सरकारच्या मनमानीला लोक कंटाळले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील विद्यमान खासदारांच्या कामाबद्दल लोक जाहीररित्या नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे लोकांना चांगला आणि महाविकास आघाडीचाच पर्याय हवा आहे. याबद्दल पक्षश्रेष्ठींनी विचार केला पाहिजे,’असे आवाहन जिल्ह्यातील नेत्यांनी केले. दरम्यान, काहींनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाबद्दलही सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.

पवार यांनीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणकोणत्या उमदेवाराचा विचार होऊ शकतो, त्याबद्दल बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे, या सर्वांचा आढावा घेतला. याचवेळी प्रत्येकाने आपआपली भूमिका बोलून दाखवली. बैठकीस आमदार सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे विजय देवणे, सुनील मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार उपस्थित होते.

Sharad Pawar Satej Patil
Jayant Patil: पुत्राची उमेदवारी अन् जयंतरावांची कसोटी; टप्प्यात करणार 'कार्यक्रम'? प्रतीकचा 'पार्थ पवार' होऊ नये म्हणून खबरदारी!

सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर श्री. पवार यांनी आमदार सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत व्यक्तिगत वीस मिनिटे चर्चा केली. यामध्ये, त्यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी कोणाबद्दल लोक सकारात्मक राहतील, याची चर्चा केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.