67883
फौंड्रीतील वाळूच्या विटा,
नॅनो पदार्थापासून औषधे
स्टार्टअप्स सादरीकरणात ७४ संशोधकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शिवाजी विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्रातर्फे इनोव्हेशन, उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांचे भित्तीचित्र प्रदर्शन आणि मॉडेल सादरीकरण स्पर्धा झाली. स्पर्धेत ७४ जणांनी सहभाग नोंदविला. त्यात फौंड्रीतील टाकाऊ वाळूपासून विटांची निर्मिती व रस्त्याकरिता पुनर्वापर, नॅनो-पदार्थापासून औषधे, रंग निर्मिती, आदी संशोधन प्रकल्प सादर झाले.
स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये ७४ पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह संशोधक आणि नवउद्योजक सहभागी झाले. त्यांनी शाश्वत विकासाबाबत पर्यावरणीय संकल्पना, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, पौष्टिक खाद्यपदार्थ निर्मिती पद्धती, नॅनो-पदार्थापासून औषधे, रंग निर्मिती, जैविक खते, ऊर्जानिर्मिती, हायड्रोजन आणि ऑक्सिजन निर्मितीची उपकरणे इत्यादी संशोधन प्रकल्प सादर झाले. स्पर्धेसाठी मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अपूर्व गुलेरिया, प्रभात सिंग, प्रतिभा पाटणकर, आसावरी जाधव, संतोष सुतार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. एस.एन. सपली, के. एम. गरडकर, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, अनिल घुले, मुरलीधर भानारकर, ईरान्ना उडचान, हेमराज यादव, अभिजीत गाताडे, चेतन भोसले, क्रांतीवीर मोरे, साजिद मुल्लाणी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.