Shahu Chhatrapati Maharaj
Shahu Chhatrapati Maharajesakal

Loksabha Election : 'तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल'; शाहू छत्रपती महाराजांचे सूचक संकेत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाची चर्चा आहे.
Published on
Summary

‘कोल्हापूर लोकसभा उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेल्याचे मला कळते; पण मी दिल्ली काय मुंबईला सुद्धा गेलेलो नाही.'

कोल्हापूर : सर्वांना अपेक्षित असलेली बातमी लवकरच येणार असल्याचे सांगत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराचे रणशिंगच फुंकले. निमित्त होते एका पुस्तक प्रकाशनाचे.

राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस परिसरात एका पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत तर दिलेच; पण थेट अपेक्षित बातमी लवकरच समजेल, असे सांगत प्रचारालाही सुरुवात केली.

Shahu Chhatrapati Maharaj
Rajyasabha Election : काँग्रेसला तीन, भाजपला एक जागा; उमेदवाराच्या पराभवामुळं धजद तोंडघशी, दोन आमदारांचा भाजपला धक्का

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला बहुतांशी पत्रकार उपस्थित होते. त्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘अपेक्षित बातमी ही सनसनाटी असेल; पण ती जबाबदारीही असेल. ही बातमी ऐषआराम करण्यासाठी नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचे मार्गदर्शनही लागणार आहे.’

Shahu Chhatrapati Maharaj
Kolhapuri Chappal : आता कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाला 'QR कोड'; बनावट उत्पादनास बसणार चाप, मोबाईलने होणार चीप स्कॅन

‘कोल्हापूर लोकसभा उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेल्याचे मला कळते; पण मी दिल्ली काय मुंबईला सुद्धा गेलेलो नाही. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचे आहे. भांडणे सोडवायची आहेत; पण बातमी समजल्यानंतर मीच तुम्हाला ती कळवेन, त्यावेळी तुम्हाला मी बोलवणार’, असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.