Kolhapur Loksabha Election
Kolhapur Loksabha Electionesakal

'मविआ'त कोल्हापूरसह राज्यातील 'या' चार जागांचा तिढा कायम; शाहू छत्रपती महाराजांचं नाव निश्‍चित होण्याची शक्यता!

हातकणंगलेची जागा महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता गृहीत धरून ‘स्वाभिमानी’ला देण्यावर सर्वांचे एकमत आहे.
Published on
Summary

कोल्हापूरसह उर्वरित तीन जागांबाबत खासदार शरद पवार, ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आज (ता. २९) मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Loksabha Election) कोल्हापूरसह राज्यातील चार जागांवर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन चर्चेत निर्णय झालेला नाही. कोल्हापूरसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) अजूनही ठाम आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना उमेदवारी देण्यास ठाकरे तयार आहेत, पण जागा मात्र शिवसेनेला द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, कोल्हापूरसह उर्वरित तीन जागांबाबत खासदार शरद पवार, ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आज (ता. २९) मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

Kolhapur Loksabha Election
Loksabha Election : 'तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल'; शाहू छत्रपती महाराजांचे सूचक संकेत

या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पटोले, माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख हे सहभागी झाले आहेत. दोन दिवस झालेल्या बैठकीत बहुतांश जागांचे वाटप व काही उमेदवारही निश्‍चित झाले आहेत.

Kolhapur Loksabha Election
संयोगीताराजेंची 'ती' पोस्ट अन् राजकीय चर्चेला उधाण; कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली!

पण कोल्हापूरसह जालना, दक्षिण मुंबई, बुलढाणा या जागांचा तिढा सुटलेला नाही. जालना मतदारसंघावर राष्ट्रवादी व शिवसेना, मुंबई दक्षिणमध्ये काँग्रेस व सेना, बुलढाण्यात काँग्रेस व वंचित तर कोल्हापुरात सेना व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या चार जागांवर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत निर्णय न झाल्याने त्यावर पक्षाच्या वरिष्ठांसोबत आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले.

Kolhapur Loksabha Election
'सातारा लोकसभा' अजित पवारांकडं? उदयनराजेंनीही व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा, संघर्ष होण्याची चिन्हे

कोल्हापुरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीला आघाडीतील कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. ही जागा गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकल्याने ती आपल्यालाच सोडावी, यावर ठाकरे गट ठाम आहे. शाहू महाराज यांना उमेदवारी द्या, पण जागा शिवसेनेला सोडा, ही त्यांची मागणी आहे. त्याला काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही विरोध आहे. स्वतः शाहू महाराज हेदेखील शिवसेनेकडून लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे त्यांच्या एकूणच भुमिकेवरून दिसते. परिणामी, या जागेचा तिढा कायम राहीला.

...तर २५ वर्षांनी ‘हात’

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विधानसभेचे तीन आमदार आहेत. पण १९९९ पासून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ हे चिन्ह मतदारसंघात दिसलेले नाही. आघाडीत जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने ही परिस्थिती आली होती. १९९९ साली झालेल्या लोकसभेत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड पराभूत झाले होते. काँग्रेस नेत्यांनी ताकद लावून ही जागा मिळवली तर तब्बल २५ वर्षांनी या मतदारसंघात काँग्रेसचा ‘हात’ दिसणार आहे.

Kolhapur Loksabha Election
Kolhapur Politics : ..तर निवडणुकीत भाजपच्या इच्छुकांनी भांडी घासायची का? ठाकरे गटाच्या नेत्याचा सणसणीत टोला

हातकणंलेतून शेट्टी यांच्याशी चर्चा

हातकणंगलेची जागा महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता गृहीत धरून ‘स्वाभिमानी’ला देण्यावर सर्वांचे एकमत आहे. पण, अजूनही माजी खासदार राजू शेट्टी आघाडीसोबत किंवा अन्य पक्षांसोबत येण्यास तयार नाहीत. शेट्टी यांच्याशी काँग्रेस नेते चर्चा करत आहेत. पण, आपल्याच भूमिकेवर शेट्टी ठाम राहिल्यास ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्याठिकाणी आमदार जयंत पाटील किंवा त्यांचे पुत्र प्रतिक यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()