EVM Machine
EVM Machineesakal

Loksabha Election : 75 हजार मतदारांनी केलं 'EVM'द्वारे मतदान; जिल्ह्यात 20 मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक

नागरिकांसह नवमतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Published on
Summary

जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन मोबाईल व्हॅनद्वारे ही मतदान यंत्र प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Elections) मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून २० मोबाईल व्हॅनद्वारे ‘ईव्हीएम’ मशीन (मतदान यंत्र) द्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात ७५ हजार ५८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ९ मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन मोबाईल व्हॅनद्वारे ही मतदान यंत्र प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. यासाठी बाजार, गजबजलेले प्रमुख चौक, वर्दळ असलेली जिल्ह्यातील १ हजार ८२१ ठिकाणे निश्चित केली आहेत. यांपैकी आतापर्यंत १ हजार ८१४ ठिकाणी मतदान घेण्यात आले आहे. १० डिसेंबर २०२३ पासून हा उपक्रम सुरू झाला आहे. यामध्ये आतापर्यंत ७५ हजार ५८८ इतके मतदान झाले आहे.

EVM Machine
Narayan Rane : नारायण राणेंच्या 'त्या' ट्विटमुळे उमेदवारीचा संभ्रम कायम; 'महायुती'त जागांसाठी रस्सीखेच सुरू

सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे मतदान प्रात्यक्षिक घेतले जात आहे. या ठिकाणी नागरिकांसह नवमतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करून घेतले जात आहे. मतदान (voting) झाल्यानंतर ते कोणाला केले, याची खात्री होण्यासाठी ‘व्हीव्हीपॅट’द्वारे संबंधित मतदाराला स्लिपही उपलब्ध करून दिली आहे. मतदान झाल्यानंतर संबंधित मतदाराची रजिस्टरमध्ये नोंद करून त्याची स्वाक्षरीही घेतली जात आहे. जिल्ह्यात ९ मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

EVM Machine
'शाहू छत्रपती महाराज सर्वांसाठीच आदर्श, पण 'महायुती'च्या उमेदवारासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू'

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रात्यक्षिक कोल्हापूर उत्तर - ११२५६ हातकणंगले- १०३८८, इचलकरंजी- ८९३९, कागल- ८३५८, कोल्हापूर दक्षिण- ८८९४, शिरोळ-८८८७, करवीर- ८४००, चंदगड- ४५४२, शाहूवाडी- ४७५२, राधानगरी- ११७२.

EVM Machine
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत 400 उमेदवार उतरवणार; सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय

नागरिकांसह नवमतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

-समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.