Kolhapur Loksabha Election Kagal Assembly Constituency
Kolhapur Loksabha Election Kagal Assembly Constituencyesakal

'कागल' ठरणार लोकसभेचा केंद्रबिंदू; समरजित घाटगेंना भाजपची उमेदवारी शक्य, शिवसेनेकडून मंडलिकांसाठी दावा

कागल विधानसभा मतदारसंघ (Kagal Assembly Constituency) हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ आहे.
Published on
Summary

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघासाठी समरजितसिंह घाटगे यांचे नाव आघाडीवर आहे.

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघ (Kagal Assembly Constituency) हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ आहे. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या विजयात या विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा राहिला. सध्या या मतदारसंघातील मोठे गट महायुतीमध्ये आहेत. तसेच महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांचे तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

या दोघांचेही कागल विधानसभा मतदारसंघात मोठे गट आहेत. त्यामुळे आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये या मतदारसंघातून जो मताधिक्य घेईल, त्याच्या गळ्याच विजयाची माळ पडेल असे चित्र सध्या दिसते. कागल हे राजकारणाचे विद्यापीठ असेल म्हटले जाते. कारण, कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची मदार राजकीय पक्षांपेक्षा गटातटाच्या राजकारणावर अधिक असते.

Kolhapur Loksabha Election Kagal Assembly Constituency
Loksabha Election : शाहू छत्रपतींबद्दल आदरच, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू - मुश्रीफ

तालुक्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, खासदार संजय मंडलिक हे मोठे गट आहेत. या शिवाय आजरा येथे अशोक चराटी, जयवंत शिंपी असे गट आहेत. तसेच गडहिंग्लज येथे डॉ. प्रकाश शहापूरकर, श्रीपतराव शिंदे (जनता दल) यांचे गट आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवरही प्रभाव टाकणारे गट या मतदारसंघात आहेत.

Kolhapur Loksabha Election Kagal Assembly Constituency
Loksabha Election : सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडं जाणार? काँग्रेस आमदार म्हणाले, यापूर्वी तीन वेळा कदम कुटुंबाला..

अद्याप या गटांची भूमिका जरी ठरली नसली तरी तीन मोठे गट हे सर्वसाधारणपणे महायुतीच्या बाजूने दिसतात. असे असले तरी महायुतीच्या विजयाची वाट सोपी नाही. महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर आणि गटांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच कागल विधानसभा मतदारसंघात कोण आघाडी घेईल, याचे अंदाज बांधता येतील. मात्र या मतदारसंघात जो आघाडी घेईल, त्याच्या विजयाची वाट सुकर असेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

घाटगे यांची दावेदारी प्रबळ

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघासाठी समरजितसिंह घाटगे यांचे नाव आघाडीवर आहे. स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित आणि सहकारातील तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घरण्याचे वंशज म्हणून त्यांना वारसा लाभला आहे. या सर्व कारणांमुळे त्यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित मानली जाते.

Kolhapur Loksabha Election Kagal Assembly Constituency
सुडाचं आणि खूनशी राजकारण केलं जातंय, संविधानाला धक्का दिला तर लढाईच; विश्‍वंभर चौधरींचा भाजपला स्पष्ट इशारा

महायुतीमध्ये रस्सीखेच

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघावरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. ही जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजपचे खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही आहेत, तर खासदारकीचा शब्द घेऊनच शिंदे गटात प्रवेश केल्याने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी नक्की आहे, असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत; मात्र ही जागा नेमकी कोणाच्या पदरात पडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()