इंचनाळला शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केला रस्ता

इंचनाळला शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केला रस्ता

Published on

gad133.jpg
70928
इंचनाळ : पाटील कुटुंबीयांनी एकत्र येत स्वखर्चातून रस्ता तयार केला आहे.
---------------------------
इंचनाळला शेतकऱ्यांनी
स्वखर्चाने केला रस्ता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शेतातील हद्दीचा वाद सर्वत्रच दिसून येतो. मग अडचणीला एकमेकांच्या शेतातून वाहतूक करु देणे तर दूरची गोष्ट. पण, इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातून तोही स्वखर्चाने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचीही सोय झाली आहे.
इंचनाळ येथील चिवळवाट पाणंदीजवळ पाटील कुटुंबीयांची जमिन आहे. येथे ऊस वाहतुकीसाठी रस्त्याची मोठी अडचण निर्माण होत होती. पाटील कुटुंबियांतील सर्वांनी एकत्र येत शेतातून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. पाटील कुटुंबीयांनी शेतातून दहा फुटाने तर डॉ. अविनाश जोशी यांनी आपल्या शेतातून दोन फुटाने असा २०० मीटर लांबीचा रस्ता केला. या रस्त्याचा खर्चही पाटील कुटुंबीयांनीच केला आहे. हा रस्ता पुढे चिवळवाट पाणंदीला जोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहे.
विलास पाटील, अविनाश जोशी, धनाजी पाटील, जनार्दन पाटील, जगन्नाथ पाटील, अभिजीत पाटील, विजयमाला पाटील, सुलोचना पाटील, सुशांत पाटील, अंकुश पाटील यांनी या रस्त्यासाठी योगदान दिले. समीर जाधव व कपिल मगदूम यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.