Dhananjay Mahadik vs Satej Patil
Dhananjay Mahadik vs Satej Patilesakal

Kolhapur Loksabha : 'तुमच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का?' खासदार महाडिकांचं सतेज पाटलांना थेट चॅलेंज

खासदार महाडिक यांनी जर पक्षाने समरजित घाटगे किंवा मला निवडणूक लढवायला सांगितले तर आम्ही मैदानात उतरू, असे सांगितले.
Published on
Summary

'डावपेच करून व भावनिक आवाहन करायचे हे आता जनतेला समजले आहे. हा नेता फसवा आहे.'

कोल्हापूर : ‘लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) जागा कॉंग्रेसला (Congress) मिळून ती लढविण्याची संधी असताना त्यांनी आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घालण्याचे काम केले आहे. ते का निवडणूक लढवत नाहीत? त्यांच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का?’ असे आव्हान खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना दिले.

‘शब्द पलटणारा नेता’ अशी प्रतिमा झालेल्या या नेत्याची सतत भावनिक वातावरण निर्माण करून दिशाभूल करायची नीती जनतेला समजली आहे. त्यामुळे त्यांना यंदा जनता दणका देणार, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Dhananjay Mahadik vs Satej Patil
प्रतीक पाटील लोकसभा लढविणार? जयंत पाटलांनी राजू शेट्टींबाबत व्यक्त केली भीती; म्हणाले, प्रतीक यांना उतरवण्याचा..

पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ‘मुळात ही जागा महाविकास आघाडीअंतर्गत ठाकरे गटाकडे होती. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा घेतली. तिथे बाजीराव खाडे, चेतन नरके इच्छुक होते, पण श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभेसाठी उभे करण्यात या नेत्याचे षड्‌यंत्र दिसते. जागा शिवसेनेची (Shiv Sena) असली तरी तिथे कुणी इच्छुक दिसत नाही. मागणीही कुणी केलेली नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार आग्रही असताना ही जागा कॉंग्रेसला मिळते, असे दिसते. डावपेच करून व भावनिक आवाहन करायचे हे आता जनतेला समजले आहे. हा नेता फसवा आहे. लोकांची दिशाभूल करतो आहे, हे समजले आहे. त्यामुळे जनतेने काय ठरवले आहे, हे आता दिसेल.

Dhananjay Mahadik vs Satej Patil
Satara Loksabha : CM शिंदेंचे समर्थक पुरुषोत्तम जाधवांनी वाढवलं उदयनराजेंचं टेन्शन; लोकसभेसाठी मागितली उमेदवारी

प्रत्येकवेळी खोटे बोलायचे हे ठरलेले आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांची जागा बिनविरोध करण्यासाठी स्वतः त्यांचे बंधू व विनय कोरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. तिथे त्यांना मला बिनविरोध करा, मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही, असा शब्द दिला; पण कारखाना निवडणुकीत पॅनेल उभे केले. त्यांचा दुर्गुण आहे की, त्यांना चांगले बोलता येत नाही. त्यांनी वाईट गोष्टी बोलत घाणेरडी व वैयक्तिक टीका केली. चारित्रहनन केले. त्यामुळे कोरे यांनी जाहीर सभेत त्यांनी शब्द पालटला, असे सांगितले. त्यामुळे शब्द पालटणारा नेता अशी त्यांची प्रतिमा उघड झाली आहे. हा फसवणारा नेता असून, आपल्याला गृहीत धरतो, हे लोकांना माहिती झाले आहे.’

Dhananjay Mahadik vs Satej Patil
Sangli Loksabha : 'स्वाभिमानी' लोकसभा लढल्यास फटका कुणाला? राजू शेट्टींची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

...तर आम्ही मैदानात उतरू

‘कोल्हापूर आणि हातकणंगले या जागा महायुतीतील शिंदे गटाकडे आहेत. याबाबतची नावे प्रसारमाध्यमातून समजत आहेत. महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून आणू. पक्षादेश पाळणारे कार्यकर्ते आम्ही आहोत, असे सांगत खासदार महाडिक यांनी जर पक्षाने समरजित घाटगे किंवा मला निवडणूक लढवायला सांगितले तर आम्ही मैदानात उतरू, असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट मिळाले तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही सक्षम उमेदवार ठरतील, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()