एस.टी. चालकाला मारहाणप्रकरणी दोघांना शिक्षा
72249
चालकाला मारहाणप्रश्नी
दोघांना १ हजारांचा दंड
कोल्हापूर, ता. १९ ः एसटी चालक आणि वाहकाला अडवून शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी दोघांना कोर्ट उठेपर्यंत व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संदीप आनंदा जंगम व अमित मारुती सनदी (रा. उजळाई कॉलनी) यांच्याविरोधात नोंदविला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाईकर यांच्या न्यायालयात खटला चालला. ७ डिसेंबर २०१४ मध्ये राधानगरी ते कोल्हापूर मार्गावर गैबी घाटात एसटीसमोर मोटार उभी करून जंगम व सनदी यांनी एसटीचालक शहाजी आनंदा ढेकळे (टिक्केवाडी, भुदरगड), वाहक रवींद्र गणपती बुजरे यांना शिवीगाळ, मारहाण केली होती. याप्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश चव्हाण यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.