अडथळा निर्माण करणारी वाहने हलवा

अडथळा निर्माण करणारी वाहने हलवा

Published on

ajr24.jpg...
74895
आजरा : येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांना निवेदन देताना परशराम बामणे. शेजारी सुधीर कुंभार, विजय थोरवत, आदी.
-------------------------
अडथळा निर्माण करणारी वाहने हलवा
अन्याय निवारण समितीची मागणी : सहायक पोलिस निरीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ : आजऱ्यातील रस्त्यावर ट्रकसह अन्य वाहने कशीही लावली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्‍याचा वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने तातडीने हलवावीत, अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. मयुर पंप ते आजरा न्यायालय नवीन इमारतीपर्यंत मनमानी पध्दतीने अवजड वाहने, चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. महामार्गाचे काम सुरू असताना ही वाहने इतर वाहनांसाठी वाहतुकीस अडथळा आहेत. या भागातील अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी उभी करण्यास प्रतिबंध करावा.’ निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे, उपाध्यक्ष सुधीर कुंभार, सचिव विजय थोरवत, सचिव पांडुरंग सावरतकर, सहसचिव राजू विभुते, सहसचिव गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, वाय. बी. चव्हाण, अभिजित रोडगी, दादू नेवरेकर, दत्ता पोवार, आदींच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.