Ambabai Temple Kolhapur
Ambabai Temple Kolhapuresakal

भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! करवीर निवासिनी अंबाबाईचं आजपासून घेता येणार पूर्ववत दर्शन; मूर्ती संवर्धन प्रक्रिया पूर्ण

गेले दोन दिवस मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भविकांना मूळ मूर्तीचे दर्शन बंद होते.
Published on
Summary

अंबाबाईच्या मूर्ती (Ambabai idol) संवर्धनाबाबत पुरातत्त्व विभागाकडे (Archaeology Department) जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी पाठपुरावा केला होता.

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Kolhapur Ambabai Temple) मूर्तीची संवर्धन प्रक्रिया काल पूर्ण झाली. आज (मंगळवार) सकाळी धार्मिक विधीनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे. दरम्यान, गेले दोन दिवस मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भविकांना मूळ मूर्तीचे दर्शन बंद होते.

पितळी उंबऱ्याबाहेरून उत्सवमूर्ती आणि कलशाच्या दर्शनाची सुविधा भाविकांसाठी देण्यात आली. श्री अंबाबाईच्या मूर्ती (Ambabai idol) संवर्धनाबाबत पुरातत्त्व विभागाकडे (Archaeology Department) जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्यासह काही भाविकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी करून मूर्तीबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Ambabai Temple Kolhapur
भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

या साऱ्या पार्श्वभूमीवर ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली. औरंगाबाद येथील पुरातत्त्व रसायनतज्ज्ञ विभाग शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून दोन दिवस मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर संवर्धनाची प्रक्रिया पुरातत्त्व रसायनतज्ज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.