Voter ID
Voter IDSakal

Voters ID: मतदान ओळखपत्र नसले तरी करा मतदान, अन्य १२ ओळखपत्रांपैकी एक धरणार ग्राह्य

Published on

कोल्हापूर ः सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी ते मतदार ओळखपत्र सादर करतील. मात्र, जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी इतर बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एकाचा वापर करता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली.


भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या १२ कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले जॉब कार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार व आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.