Malojiraje Chhatrapati
Malojiraje Chhatrapatiesakal

'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर मंडलिक-मालोजीराजे आले एकत्र; दोघांना एकत्र बघून लोकही झाले अवाक्‌, असं काय घडलं?

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्ह्यातील लोकसभेचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
Published on
Summary

गेल्या आठवड्यात प्रा. मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या दत्तक विधानाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती.

कोल्हापूर : रामनवमीच्या (Ram Navami) निमित्ताने कागल येथील राम मंदिरात लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांचे पुत्र माजी आमदार मालोजीराजे (Malojiraje Chhatrapati) सहकुटुंब एकत्र आले. अलीकडेच प्रा. मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांना एकत्र बघून लोकही अवाक् झाले. मात्र, दोघांत विशेष संभाषण झाले नाही.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्ह्यातील लोकसभेचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दोन्ही आघाडींच्या नेत्यांकडून एकमेकांवर टिका केली जाते. त्यात उमेदवारांपेक्षा त्यांचे पाठिराखे असलेल्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. पण, गेल्या आठवड्यात प्रा. मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या दत्तक विधानाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती.

Malojiraje Chhatrapati
Satara Lok Sabha : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत; पवारनिष्ठा पणाला!

राज्यभरातून प्रा. मंडलिक यांच्या या वक्तव्याचा निषेध झाला. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्यावतीने निदर्शनेही करण्यात आली. काल शहर व जिल्ह्यातील राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अंबाबाई मंदिरातील राम मंदिराला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी भेट देत जन्मोत्सवालाही हजेरी लावली. तर कागल येथे शाहू कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या राम मंदिरातही मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली.

Malojiraje Chhatrapati
Supriya Sule : 'शरद पवारांना संपविणं एवढं सोपं नाही'; सुप्रिया सुळेंचा कोणावर वार?

या मंदिरातील राम जन्मोत्सवाला प्रा. मंडलिक अगोदरच दाखल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांनीही हजेरी लावली. या दोघांच्या हस्ते आरती करण्यात आली. ‘शाहू’ ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांनी या दोघांचे स्वागत केले. यावेळी प्रवीणसिंह घाटगेही उपस्थित होते. समरजितसिंह घाटगे हे प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तर प्रा. मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर थेट मालोजीराजे हेच त्यांच्या समोर आले. या दोघांना एकत्रित पाहून लोकही अवाक झाले आणि त्यांच्या भुवया उंचावल्या.

Malojiraje Chhatrapati
'बसप' बिघडवणार 'सप', 'भाजप'चे गणित; दलित, मुस्लिम मते BSP च्या बाजूने जाणार? जातीचे समीकरणं ठरणार निर्णायक!

मानाचा नारळ ...

प्रा. मंडलिक आपल्या सहकाऱ्यांसह श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे श्रीराम मंदिरात आगमन झाले. यावेळी मंडलिक यांना मानाचा नारळ देऊ केला. पण, मंडलिक यांनी पाहुणे म्हणून आलेल्या मालोजीराजांच्या हाती हा नारळ द्यावा, अशी पुजाऱ्यांना विनंती केली. त्यावर मालोजीराजे यांनीही प्रा. मंडलिक यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत हा नारळ मंडलिकांच्याकडे द्यावा, असे सांगितले. त्यानंतर पुजाऱ्यांनी तो नारळ मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.