Kalamba Jail
Kalamba Jailesakal

कळंबा कारागृहात चाललंय काय? जमिनीत पुरलेले 15 मोबाईल जप्त; आतापर्यंत 50 हून अधिक मोबाईल जप्त केल्याने उडाली खळबळ

प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांनी महिन्याभराच्या कालावधीत ५० हून अधिक मोबाईल जप्त केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती.
Published on
Summary

मागील दीड महिन्यात सुमारे शंभरावर मोबाईल, चार्जर, बॅटरी, सीमकार्ड, पेनड्राईव्ह असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष पथकाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेला चांगले यश मिळत आहे.

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) बरॅकसमोरील रिकामी जागा, शौचालय, कचरा पेटी अशा ठिकाणी सापडलेल्या मोबाईलसोबत आता जमिनीत पुरलेले मोबाईलही तपासणीत सापडले. नव्याने १५ मोबाईल आढळले असून, मागील बारा दिवसांत पंचवीसहून अधिक मोबाईल (Mobile) प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांनी शोधून काढले आहेत.

कैद्यांनी कळंबा कारागृहात लपवलेले मोबाईल शोधण्यासह येथील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ''ऑपरेशन कोल्हापूर क्लीन'' ही मोहीम (Operation Kolhapur Clean Mission) ३० मार्चपासून सुरू करण्यात आली. यासाठी राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांचे अधिकारी बोलावून त्यांचे विशेष पथक बनविण्यात आले आहे. मागील प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांनी महिन्याभराच्या कालावधीत ५० हून अधिक मोबाईल जप्त केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती.

Kalamba Jail
शिंदे गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या जिल्हाध्यक्षाला तातडीनं अटक करा; राजेखान जमादारविरुध्द पत्रकार आक्रमक

नूतन अधीक्षकांकडूनही २५ मोबाईल जप्त

सध्याचे प्रभारी अधीक्षक झेंडे यांनी ३० एप्रिलला पदभार स्वीकारला. पहिल्या दोन दिवसांतच त्यांनी कारागृहाची झडती घेत १२ मोबाईल जप्त केले होते. त्यानंतर प्रवेशद्वारावर होणारी तपासणी, तटबंदी भोवतीची गस्त आणखी कडक करण्यात आली होती. झेंडे यांनी आता थेट जमिनीत पुरलेले मोबाईलच जप्त केले आहेत.

यापूर्वी अकरा जण बडतर्फ

कळंबा कारागृहातील मोबाईल, अमली पदार्थांचे साठा मिळून आल्याने तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुण्याला बदली करण्यात केली होती. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून याप्रकरणी दोन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Kalamba Jail
Jat-Sangola Road Accident : कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात; 3 महिला ठार, तर 10 जण जखमी

मोबाईलसह साहित्याचा साठा

मागील दीड महिन्यात सुमारे शंभरावर मोबाईल, चार्जर, बॅटरी, सीमकार्ड, पेनड्राईव्ह असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष पथकाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेला चांगले यश मिळत असून, कळंबा कारागृहात दिल्या गेलेल्या सवलतींचा नेमका ''अर्थ'' समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.