साई इंटरनॅशनल स्कुलचे सीबीएसई परीक्षेत यश

साई इंटरनॅशनल स्कुलचे सीबीएसई परीक्षेत यश

Published on

gad146.jpg ः
83603
लिनोरा मुल्ला, सांची कांबळे, सेनद बुवा
-----------------------------------------
साई इंटरनॅशनल स्कूलचे
सीबीएसई परीक्षेत यश
गडहिंग्लज, ता. १४ : येथील साई इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल उत्कृष्ठ लागला. स्कूलमध्ये लिनोरा मुल्ला ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली. सांची कांबळेने ९२.२०, सेनद बुवा याने ९१.८० टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. संयोगीता पाटीलने ९०.८०, तर आर्यन आगलावे याने ९०.४० टक्के गुण घेऊन चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. उत्तीर्णपैकी ८ विद्यार्थ्यांना ८५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले. तेजस्विनी चौगुलेने मराठीत ९९, संयोगीताला आयटीमध्ये ९७, लिनोरा हिने समाजशास्त्रात ९७, तर गणित व इंग्रजीत ९५, श्रेया शेंद्रीला हिंदीत ९६, सांची कांबळे, सेनद बुवा याला इंग्रजीमध्ये ९५ गुण मिळाले. संस्थाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरी, संचालक तुषार पाटील, प्राचार्य सुजाता नागराळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.