शिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

शिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

Published on

87675
....

शिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल
संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ ः पगवारा-जालंधर (पंजाब) मधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये उद्या मंगळवार (ता. ४) ते शनिवार(ता. ८) दरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघ रवाना झाला आहे.
या संघात शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू संघाची कर्णधार स्वप्नाली वायदंडे, ऐश्वर्या पुरी, करिश्मा कुडचे, प्रियंका अंची (सर्व शिवाजी विद्यापीठ), श्रावणी चौगुले, सानिका संकपाळ, अलिशा कांबळे, स्वाती कांबळे (सर्व महावीर कॉलेज), मनीषा पवार, आर्या पाटील (ए. सी. एस. कॉलेज, पलुस), निकिता पाटील, दीक्षा शिंदे (डॉ. पी. कदम महाविद्यालय रामानंदनगर), हर्षदा कांबळे (कन्या महाविद्यालय मिरज), सलोनी नलवडे (एस. जी. एम. कॉलेज, कराड), करिश्मा तारळेकर (विलिंग्डन कॉलेज, सांगली) यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. बाबासाहेब सरगर, मार्गदर्शक म्हणून प्रा. सुशांत कायपुरे काम पाहत आहेत. दरम्यान, गेली दोन वर्ष या संघाने कास्य आणि रौप्यपदक प्राप्त करुन राष्ट्रीय विद्यापीठ पातळीवर दबदबा निर्माण केला आहे. यंदा संघ सुवर्णपदकाची कमाई करेल, अशी शुभेच्छा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी खेळाडूंना दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, प्राचार्य डॉ. बाबासो उलपे, डॉ. राजेंद्र रायकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.