हलकर्णी वसाहतीत उद्योगचक्राला गती

हलकर्णी वसाहतीत उद्योगचक्राला गती

Published on

chd93.jpg
88983
हलकर्णी : औद्योगिक वसाहत.
--------------------
हलकर्णी वसाहतीत उद्योगचक्राला गती
पायाभूत सुविधांची उपलब्धतता : सुमारे ८०० जणांना रोजगार, अडीच कोटींची उलाढाल
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ : हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, वीज आणि रस्ते या पायाभूत सुविधा पुरविल्यामुळे उद्योगांची संख्या वाढत आहे. सध्या सुमारे ६० उद्योग कार्यान्वित असून, नवीन उद्योगांची उभारणीही जोमात सुरू आहे. वसाहतीच्या पटंग माळावर आता जागोजागी उद्योगांच्या भव्य इमारती लक्ष वेधून घेत आहेत.
उद्योगाच्या विकासासाठी रस्ते, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधा मानल्या जातात. १९९० ला स्थापन झालेल्या या वसाहतीत या सुविधांचीच वानवा होती. त्यामुळे उद्योजक येथे यायला धजत नसत. २०१८ मध्ये एमआयडीसी असोसिएशन हलकर्णी या नावाने उद्योजकांची संघटना स्थापन झाली आणि महामंडळाकडे पाठपुरावा करून टप्‍प्याटप्‍प्याने सुविधा पूर्ण केल्या. रस्त्यांसाठी अडीच कोटी, पाणी योजनेसाठी ५० लाख आणि विजेसाठी ५९ लाखांचा निधी वापरला. प्रत्येक प्लॉटधारकाला त्याच्या गरजेनुसार वीजपुरवठा केला. रात्री चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यासाठी पथदीवे सुरू केले. त्यावर एक कोटी ९० लाखांचा निधी खर्च झाला. सध्या वसाहतीत सुमारे ६० उद्योग कार्यान्वित आहेत. त्यामध्ये पेपर मील आणि इंजिनिअरिंग हे दोन मोठे उद्योग आहेत. त्याशिवाय अॅग्रो प्रोसेसिंग, ऑईल, काजू प्रोसेसिंग, फाउंड्री, राईस मिल, बेकरी, हॉटेल्स, आदी उद्योगांचा समावेश आहे. त्यातून सुमारे ८०० जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे. महिन्याला सुमारे अडीच कोटींची उलाढाल आहे. येऊ घातलेल्या एका मल्टीनॅशनल कंपनीतून सुमारे २००० रोजगार उपलब्ध होणार आहेत. शिवाय तीन इथेनॉल प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे.
----------------
संघटनेच्या पुढाकारातून उद्योगांसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात यश आले. ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत, त्यांनी आपल्या उद्दिष्टानुसार काम सुरू करायला हवे. जे प्लॉट घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार आहे.
- विलास देसाई, अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन, हलकर्णी, ता. चंदगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.