शरद पवार यांची सप्रे परिवाराला भेट
SYSTEM

शरद पवार यांची सप्रे परिवाराला भेट

Published on

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : उद्योजक शिरीष सप्रे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रात्री नऊच्या सुमारास नागाळा पार्क येथील दिवंगत शिरीष सप्रे यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यांच्यासमवेत पत्नी प्रतिभा पवारही होत्या. यावेळी त्यांनी सप्रे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सप्रे परिवारातील सुश्मिता सप्रे, पद्माकर सप्रे, राजश्री सप्रे-जाधव, आदित्य जाधव,यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा(शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक रामराजे कुपेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने आदी उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी (ता. २९) सकाळी ९ वाजता दिवगंत आमदार पी. एन. पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.