Mahayuti : पश्चिम महाराष्ट्रात जरी चारच जागा आल्या असल्या तरी.. चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणूकीसाठी केली मोठी घोषणा !
Western Maharashtra politics: राज्यातील २८८ जागा लढण्याची आपली तयारी आहे, मात्र आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे. भाजप राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी करत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आज भाजपच्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील नेत्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात जरी महायुतीच्या चारच जागा आल्या असल्या तरी आपल्याला मिळालेली मते महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. विधानसभा निवडणूक आपण महायुतीमध्येच लढवणार आहोत.
मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे. राज्य अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेले संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिवेशने घेण्यात येतील.’
यावेळी अनेक प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरसाठी योगेश टिळेकर, कोल्हापूर पूर्व, हातकणंगलेसाठी जगदीश मुळीक, कोल्हापूर पश्चिमसाठी योगेश टिळेकर, सांगली शहरसाठी संजय बाळा भेगडे, सांगली ग्रामीणसाठी धनंजय महाडिक, साताऱ्यासाठी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती प्रदेश भाजपमार्फत केली आहे.’
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांमार्फत संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. दक्षिण विभागप्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे अनेक दाखले देत आगामी कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोकापर्यंत योजना पोहचवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत ही योजना असो; त्याचा प्रचार आणि प्रसार करा. लोकांपर्यंत या योजना पोहचवा. त्यामुळे लोकांना महायुतीच्या काळातील निर्णयांची कल्पना येईल. संघटनात्मक ताकद वाढवा, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.