अंबाबाई मंदिर परिसरात स्कायवॉक

अंबाबाई मंदिर परिसरात स्कायवॉक

Published on

बहुमजली पार्किंग ते अंबाबाई मंदिर स्कायवॉकचा विचार
मुंबईत झालेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली सूचना

कोल्हापूर, ता. १३: बहुमजली पार्किंग ते अंबाबाई मंदिर स्काय वॉक करता येईल का याची पडताळणी करा, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. शहरातील प्रश्नांवर त्यांनी आज मंत्रालयात याबाबतची आढावा बैठक घेतली.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, मंदिराच्या परिसरात बहुमजली पार्किंगचे काम सुरू आहे. वाहन उभे केल्यानंतर तेथून गर्दीतून वाट काढत भाविकांना मंदिरात यावे लागते. यासाठी बहुमजली पार्किंग ते अंबाबाई मंदिर या मार्गावर लोखंडी स्कायवॉक करता येईल का याची पडताळणी करा, असे शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांना सांगितले. रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन समितीने यासाठी चार कोटीचा निधी दिला आहे. रंकाळ्याचे ऐतिहासिक स्वरूप तसेच ठेवून हा परिसर कसा सुशोभित करता येईल याचे नियोजन करून गतीने कामाला सुरुवात करा असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.
शाहू मिलच्या जागेत होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजर्षी शाहू महाराज यांचे ३९० कोटींचे स्मारक, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा ७९ कोटी, पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरण २ कोटी ३० लाख, फुटबॉल स्ट्रीट थीम ५० लाख, हुतात्मा पार्क ५० लाख, गंगावेश व मिरजकर तिकटी येथे दुधकट्टा सुशोभीकरण ४० लाख निधी प्रस्तावित आहे. याबाबतचे सादरीकरण महापालिका अधिकाऱ्यांनी केले. सोमवारी (त.१७) मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे. कनिष्ठ अभियंता अरुण गवळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com