पक्षी निरीक्षण

पक्षी निरीक्षण

Published on

14077, 14075,14073,14071

गवताळ भागातील पदपथामुळे स्थलांतरित पक्ष्यांत घट
राजाराम तलाव परिसरातील निरीक्षणात नोंद : बर्डस्‌ ऑफ कोल्हापूरचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : बर्डस्‌ ऑफ कोल्हापूरतर्फे राजाराम तलावात केलेल्या पक्षी निरीक्षण गणनेत संकटग्रस्त यादीतील इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय), ब्लॅक हेडेड इबिस (पांढऱ्या डोक्याचा शराटी) यांची नोंद झाली. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) यादीतील ते पक्षी आहेत. तलावाच्या शेजारी गवताळ भागात केलेल्या पदपथामुळे येथे येणाऱ्या स्थलांतरित धोबी प्रजाती, तिरचिमणी, भारीट पक्ष्यांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रणव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, मंदार रूकडीकर व ऋतुजा पाटील यांनी नोंदी केल्या. बर्डस्‌ ऑफ कोल्हापूरतर्फे पक्षी गणनेच्या पाचव्या हंगामातील सहाव्या भागाची पक्षी गणना राजाराम तलाव येथे झाली. धोबी प्रजाती, तिरचिमणी, भारीट पक्ष्यांची यापूर्वी सुमारे तीनशेहून अधिक संख्या असायची. यंदाच्या गणनेत ती दीडशेवर आल्याची माहिती देसाई यांनी दिली. पक्षी गणनेचा सातवा भाग रविवारी (ता. ७) शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे.

चौकट
नोंद झालेले पक्षी
स्थलांतरित पक्षी : बुटेड इगल (सुतुंग), कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा टीलवा), वूड सांडपायपर (कवड्या तुतारी), कॉमन सांडपायपर (सामान्य तुतारी), बार्न स्वालो (माळ भिंगरी), ब्राउन श्राइक (तपकिरी खाटीक), एशी ड्रोंगो (राखी कोतवाल), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), टायगा फ्लायकॅचर (लाल कंठाची माशीमार), क्लॅमरस रीड वॉब्लर (दंगेखोर बोरू वटवट्या), ब्लिथस रीड वॉब्लर (ब्लिथचा वेळू वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या), सायबेरीयन स्टोनचॅट (सायबेरीयाचा गप्पीदास), ब्लिथस् पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), सिट्रीन वॅगटेल (पिवळ्या डोक्याचा धोबी), ग्रे वॅगटेल (करडा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी).

चौकट
पक्षी गणनेत काय?
* ९२ प्रजातींच्या ८५५ पक्ष्यांची नोंद
* १८ स्थलांतरित, २ स्थानिक, ७२ रहिवासी प्रजातींची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.