पाण्याअभावी झाडे सुकली

पाण्याअभावी झाडे सुकली

Published on

00824
लाईन बाजारमध्ये
पाण्याअभावी
झाडे सुकली

कसबा बावडा : लाईन बाजार येथील दरबार कार्यालय परिसरातील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. सरंक्षणासाठी येथे झाडांना कुंपण घातले आहे. मात्र काही झाडांभोवती असलेली सिमेंटची कुंपणेही मोडकळीस आली आहेत. त्यामुळे पाणीही नाही अन् संरक्षणही.. अशी झाडांची स्थिती आहे. सध्या कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. या उन्हात पाण्याअभावी झाडे सुकली आहेत. झाडे मोठी तर झाली आहेत. मात्र वेळेवर पाणी नसल्याने पाणी झडून गेली आहेत. येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून या झाडांना पाणी दिले जाते. परंतु कडक उन्हात हे पाणी अपुरे पडत आहे. झाडांना थोड्या प्रमाणात जरी पाणी मिळाले तरी ही झाडे पुन्हा टवटवीत दिसतील. त्यामुळे वाया जाणारे पाणी येथे वापरता येईल अशा पद्धतीने तरतूद करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.