‘पडळ ते माजगाव रस्त्याच्या
बाजूपट्याचे काम पुर्ण करा’

‘पडळ ते माजगाव रस्त्याच्या बाजूपट्याचे काम पुर्ण करा’

Published on

03260
माजगाव (ता. पन्हाळा) : पडळ ते माजगाव रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचे काम रखडले आहे.

‘पडळ ते माजगाव रस्त्याच्या
बाजूपट्ट्यांचे काम पूर्ण करा’
माजगाव, ता. १ : पडळ ते माजगाव (ता. पन्हाळा) या दरम्यानच्या ओढ्यावर रस्त्याचे बाजूपट्ट्यांद्वारे रुंदीकरण सुरू आहे; मात्र एक महिन्यापासून या बाजूपट्ट्यांचे काम रखडले आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी बाजूपट्ट्यांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पडळ ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पाटील यांनी केली आहे. ओढ्याजवळ खडी व मुरूम टाकून बाजूपट्ट्यांचे रुंदीकरण सुरू आहे; मात्र मागील एक महिन्यापासून हे काम रखडले आहे. जागोजागी मुरुमाचे ढीग तसेच आहेत. बाजूपट्ट्यांची दोन-अडीच फुटांनी खोदाई केली आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. खोदाई केलेला रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या बाजूपट्ट्यांचे कामे पूर्ण करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.