नानीबाई चिखली - ''मृग नक्षत्र

नानीबाई चिखली - ''मृग नक्षत्र

Published on

‘मृग’ सरींचा सुगंध
दरवळलाच नाही
नानीबाई चिखली ता. २२ ः पावसाच्या सुरुवात ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली तरी पावसाच्या आगमनाचा खरा आनंद मृग नक्षत्रापासूनच होतो. ग्रामीण भागात याला ''मृग लागले'' म्हणतात. याच मृगाचा पहिला पाऊस मातीला सुगंध घेऊन येतो. तो सुगंध सगळीकडे दरवळत असतो. परंतु ८ जूनला निघालेले मृग'' नक्षत्र नुकतेच सरले.तरीही पावसाचा पत्ता नसल्याने ‘मृग’ सरींच्या कस्तुरीचा सुगंध दरवळलाच नाही. आर्द्रा बरसेल या आशेवरच शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत.

सूर्य २७ नक्षत्रांतून वर्षभरात प्रवास करतो. २७ पैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य,आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही ९ नक्षत्रे पावसाची मानली जातात. यात मृग नक्षत्र महत्त्वाचे आहे. ‘मृग’ शब्दाचा अर्थ हरीण. तिच्या बेंबीतील कस्तुरी ईश्वरी ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हरणाच्या बेंबीत मनमोहक सुगंधित कस्तुरी असते. मात्र तिचा सुगंध तिलाच घेता येत नाही. त्या सुगंधासाठी ती जंगल पिंजून काढते. अशीच स्थिती शेतकऱ्यांची असते. मृग सरींच्या कस्तुरीचा सुगंधच बळीराजाला पुढील कामासाठी बळ पुरवीत असतो.
जिल्ह्यात हवामान खात्याने पर्जन्यमान चांगले होईल असा अंदाज व्यक्त केल्याने रोहिणी नक्षत्राआधीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. परंतु मृग नक्षत्राचे पूर्ण दिवस लोटून गेले तरीही वरुणराजाची कृपा झाली नाही. सर्वत्र पाणीबाणीची परिस्थिती झाल्याने पिके वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.

रूतून बसलेला हत्ती... अन् दडी मारलेला पाऊस
‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही मजेशीर बाब आहे. प्रत्येक नक्षत्राचे विशिष्ट वाहन असते. यंदा ‘मृग’ नक्षत्राचे वाहन हत्ती होते. खरंतर हत्ती संपन्नतेचे प्रतीक मानला जातो. मात्र यावर्षी हत्ती रुतून बसलेला पाहायला मिळाला. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडेच गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.