सतेज पाटील
सतेज पाटीलsakal

Satej Patil: सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांची चेष्टा चालवली आहे, विधानसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करा

Kolhapur vidhansabha: लोकसभेप्रमाणे जनतेने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सहकार्य करावे.’ असे आवाहन सतेज पाटील यांनी केले
Published on

फुलेवाडी, ता. १५ : ‘‘सत्ताधारी केवळ फसव्या घोषणांचा भडीमार करत आहेत. महागाईची फोडणी तिखट झाली आहे. सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झाले आहे. त्यामुळे भाजपला हद्दपार करा,’ असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.


फुलेवाडी व लक्षतीर्थ वसाहत येथील गायरानातील निवासी प्रयोजनासाठी नियमित आदेश झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘सणाच्या काळात महागाई वाढवून सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांची चेष्टा चालविली आहे. रोजगाराची समस्या कायम आहे. महिला, मुली सुरक्षित नाहीत. लोकसभेप्रमाणे जनतेने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सहकार्य करावे.’


माजी नगरसेवक राहुल माने म्हणाले, ‘निवासी आदेश व्हावेत यासाठी गेले ४० वर्षे पासून प्रयत्न केले जात आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. सामान्य लोकांना हक्काची निवासी जागा मिळाल्याचा आनंद आहे.’ आचारसंहिता सुरू झाल्याने जाहीर सभेत निवासी प्रयोजनाचे नियमित आदेश देण्याचे यावेळी आमदार पाटील यांनी टाळले. यावेळी जयसिंगराव माने, नागोजीराव पाटील, पंडितराव बोंद्रे, सदाशिव पाटील, शामराव माने, बाळासाहेब लाड, अतुल बोंद्रे, कुमार कांबळे, तात्या खेडकर, शंकू इंगवले, राजू मोहिते, आनंदराव पाटील, अनिल भालेकर, बाबूराव बोडके, सुनील मंडलिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.