संघर्षातून गुळ उद्योगाने उमेद जागवली.

संघर्षातून गुळ उद्योगाने उमेद जागवली.

Published on

21263, 21264

गुळाचा गोडवा वाढतोय...
कोरोनाचे संकट, मनुष्यबळाचा अभाव यासह इतर संकटांवर मात करत जिल्ह्याचा गूळ उद्योग स्थिरस्थावर होत आहे. मध्यंतरी काळात गूळ उत्पादन बंद पडते की काय; अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोन वर्षांत महापूर व कोरोनाच्या महामारीमुळे हंगामांचे गूळ उत्पादन जमेतेम झाले. तरीही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अनेक अडचणीना व संकटांना पार करत संघर्षातून रासायनिक गूळ उत्पादनाबरोबर सेंद्रिय गूळ उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी पुन्हा एकदा आश्वासक चित्र निर्माण केले आहे.
- सुरेश पाटील, सोनाळी
-----------------

कोल्हापूर गुळाला मिळालेला नैसर्गिक गुणधर्मामुळे देशांतर्गत बाजारपेठ काबीज केली. अशा प्रयत्नानंतर कोल्हापूरी गुळाने ओळख
सातासमुद्रापार नेली आहे. सध्या जागा आणि माणसांची कमतरता, दरातील चढउतार, सरकारचे सोयीस्कर दुर्लक्ष आणि नैसर्गिक संकंटामुळे नावारुपाला आलेल्या या उद्योगाला संकटांनी घेरून टाकले आहे. दर्जेदार निर्मल आणि सकस पध्दतीने गुळाची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा मिळालेली बाजारपेठ गमावण्याची शक्यता आहे.
साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी जिल्ह्यात १२५० इतकी नोंदणीकृत गुऱ्हाळघरे होती. साखर कारखान्याची ३६ एवढी संख्या असूनही गुऱ्हाळांचे इंजिन धडधडत असे; गेल्या चार - पाच वर्षात आलेल्या संकंटामुळे गुऱ्हाळाची चिमणी थंड पडत आहे. आताच्या घडीला जिल्ह्यात चालू गुऱ्हाळाचा आकडा ४००च्या आत असून त्यामध्ये सक्षमपणे २०० गुऱ्हाळघरेच सुरू आहेत. राबणुकीच्या तुलनेने गुळाला मात्र भाव मिळत नाही. चांगली मजुरी मिळत नसल्यामुळे मजुरांनी इतर व्यवसायाकडे ओढा वाढला आहे. ॲडव्हान्स घेऊनही मजूर कामावर न येणे, लोक कमी आणणे, काम सोडून जाणे. तसेच विद्युत दर माफक असला तर साईड मीटरचे बिल जादाच येते. अवकाळीचा फटका, आवक वाढली की हंगाम लांबणार यांचा अंदाज घेऊन व्यापारी दर पाडतात. या सर्वांचा परिणाम म्हणून गुऱ्हाळ व्यवसाय जात असून यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी साखर घालून गुळाला पर्याय शोधला आहे. पण हा पर्याय ब्रँडसाठी घातक असल्याने हा मार्ग सोडून छोट्या छोट्या क्षेत्रावर सेंद्रिय गूळ निर्मितीचे उद्योग पुढे येत आहेत.

कोरोनाच्या वैश्विक महामारीचा उद्योगांना फटका बसला. आर्थिक परिस्थिती खालावली. यापासून गूळ उद्योगही सुटला नाही. यामध्ये काही ग्रामीण भागातील शेतकरी व संस्थांनी आपल्या कार्याची चमक दाखवली. लॉकडाऊनमुळे शेतीमाल निर्यात ठप्प झाली. शेतीमाल निर्यात करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. पाडळी खुर्द येथील युवा उद्योजक सरदार पाटील यांनी संकटाच्या काळातही संधी निर्माण केली. सरदार ऑरगॅनिक शेतकरी उत्पादन, माध्यमातून सेंद्रिय गुळाची निमिती करण्यास सुरवात केली आहे. हणमंतवाडी (ता. करवीर) येथील संदीप पाटील हे १० वर्षांपासून सेंद्रिय गूळ उत्पादक असून स्थानिक व गुजरात बाजारपेठेत थेट विक्री करतात. यांच्याच मार्गदर्शनाखाली सरदार पाटील यांनी सेंद्रिय गूळ उत्पादन सुरू केले आहे. कोरोना काळात कोरोनाला हरविण्यासाठी जगभरात पयत्न सुरू होते. शरीरात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी पदार्थ आहारात घेण्यासाठी महत्त्व वाढले होते. हे ओळखून सेंद्रिय गूळ स्थानिक मार्केटमध्ये आणला. सध्या त्याचे वृद्धीसाठी दिशादर्शक काम सुरू केले आहे. कोल्हापुरातील तुषार कामत यांची तेजस ऑरगॅनिक शेतकरी कंपनीने स्थानिक बाजारपेठात गुळाबरोबर सेंद्रिय गुळाचे चॉकलेट, मसाला, फ्लेवर्स चॉकलेट, बिस्किट बनवले आहेत. त्यांनी सेंद्रिय गुळाचे पीजीएम प्रमाणपत्र घेतले आहे. स्थानिक शेतकऱ्याकडून सहकार्य घेतले आहे. सेंद्रिय गूळ ६० रुपये किलो असल्यामुळे याकडे शेतकरी वळले आहेत.
कोल्हापुरातील दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी बाजारपेठाच्या मागणीनुसार पुरवठा करत आहे. घरपण (ता. पन्हाळा) येथीळ शेतकरी मोळे यांची शेती व सेंद्रिय उत्पादने याची मागणी आजही आहे. कोरोनाच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून आखाती देशातील कंपन्यांमार्फत अनेक उत्पादनांची माहिती पोचवल्याची माहिती मिळाली आहे. दरवर्षी गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. उत्पादनही घटत आहे. सध्या स्थितीमध्ये दरवर्षी सव्वा दोनशे कोटींची उलाढाल या उद्योगातून होते. स्थानिक पातळीवर हजारो लोकांना रोजगार मिळतो.
-------------
चौकट
कोल्हापुरी गुळाचे कार्यक्षेत्र
कोल्हापूर शेती उत्पादन बाजार समिती दरवर्षी बाजार समितीच्या माहितीनुसार (२०२३) समितीकडे ३५० ते ४०० नोंदणीकृत गुऱ्हाळघरे असून ३५० सुरू आहेत. ४० अडते, ५७० व्यापारी, १२०० अडते व व्यापारी सह. संस्था, ९ मदतनीस, ६० हमाल, ६०० तोलाईदार, ११० प्रकिया करणारे अशी यंत्रणा कार्यरत आहे. समितीचे क्षेत्र करवीर, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा व कागल तालुक्यातील ४५ गावे असे आहे. मुख्य बाजार, शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर तर दुय्यम बाजार कागल, मलकापूर व टेंबलाईवाडी येथूनही चालतो. दोन वर्षांपासून राज्य मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्हयातील शेती उत्पादनांपैकी सेंद्रिय गूळ, बेडगी मिरची आणि मिरची पावडर खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था, पणन संस्था बचतगट यांच्याकडून मागणी केली आहे. याचा फायदा सेंद्रिय गूळ उत्पादकांना होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.