पूरग्रस्तांची व्यवस्था करावी

पूरग्रस्तांची व्यवस्था करावी

Published on

पूरग्रस्तांची व्यवस्था करावी
आंदोलन अंकुशतर्फे आमदार यड्रावकर, तहसीलदारांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. २६ ः तालुक्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पूरग्रस्त नागरिकांची आणि जनावरांची निवाऱ्याची चाऱ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शासनाची आहे. तत्काळ व्यवस्था करावी यांसह अन्य मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशतर्फे तहसीलदार अनिलकुमार हेळकर व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे.
शिरोळ तालुका पुराच्या पाण्यात पुन्हा एकदा बुडत आहे. तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावात महापुराचे पाणी पसरल्याने नागरिकांचे व जनावरांचे स्थलांतर सुरू आहे. त्यांना आपत्ती कायद्याअंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देणे तालुक्याचे आपत्ती निवारण प्रमुख म्हणून आपली जबाबदारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दीपक पाटील, धनाजी चुडमुंगे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.