वारणा दूध संघामार्फत दीपावली  निमित्त सभासदांना तूप भेट - अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांची माहीती /  ६ पासून वाटप

वारणा दूध संघामार्फत दीपावली निमित्त सभासदांना तूप भेट - अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांची माहीती / ६ पासून वाटप

Published on

04051
वारणा दूध संघामार्फत सोमवारपासून
सभासदांना दीपावलीनिमित्त तूप भेट

वारणानगर, ता. २ : तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सभासदांना तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
६ ते २० नोव्हेंबर कालावधीत प्राथमिक दूध संस्था, वितरण केंद्रे व वितरकांमार्फत तूप वाटप करण्यात येईल. वारणा दूध संघाच्या ज्या ‘अ’ वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे दुधाचा दूध संस्थामार्फत संघास पुरवठा करतात अशा ‘अ’ वर्ग सभासदांना, ‘ब’ वर्ग संस्था सभासदांना व राज्यभरातील ‘क’ वर्ग ग्राहक सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी व दीपावलीला सवलतीत तूप भेट म्हणून दिले जाते. वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांकडे सभासदांना ६ ते २० नोव्हेंबर कालावधीत तूप वितरण होईल. कोल्हापूर व परिसरातील ‘अ’ वर्ग व ‘क’ वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड कोल्हापूर विक्री केंद्रातून ६ नोव्हेंबरपासून वाटप सुरू होईल. सभासद व ग्राहकांनी कागदपत्रांची झेरॉक्स दाखवून तूप घेऊन जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, संचालक मंडळ, अकौट्स मॅनेजर सुधीर कामेरिकर व अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.