Kalammawadi Radhanagari Dam
Kalammawadi Radhanagari Damesakal

Dam Water Storage : पाणी तुटवड्याचं संकट! काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरणात किती आहे साठा?

राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा केवळ ३०० एमसीएफटी, तर तुळशीत १०० एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे.
Published on
Summary

काळम्मावाडीत गतवर्षीपेक्षा दोन टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. या धरणात गतवर्षीपेक्षा यंदा चार टीएमसीने अधिक पाणीसाठा केला.

राधानगरी : यंदा २७ फेब्रुवारीअखेर काळम्मावाडी धरणात (Kalammawadi Dam) मागील वर्षाच्या तुलनेत अधिक, तर राधानगरी (Radhanagari Dam) आणि तुळशी धरणात समतोल पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी तीन-साडेतीन महिन्यात होणाऱ्या पाणी वापराचा लेखाजोखा पाहता या तीनही धरणांच्या लाभक्षेत्रात पाणी कमतरतेची शक्यता नाही.

शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक (Water Storage) पाणी राहील. अशीच सद्यस्थिती आहे, मात्र परिस्थिती पाहता काटकसरीने पाणी वापरणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा केवळ ३०० एमसीएफटी, तर तुळशीत १०० एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे.

Kalammawadi Radhanagari Dam
Sugarcane Fire : 18 महिने पोटच्या पोराप्रमाणं सांभाळलेला ऊस स्वतःच्या हातानं पेटवून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

काळम्मावाडीत मात्र गतवर्षीपेक्षा दोन टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. या धरणात गतवर्षीपेक्षा यंदा चार टीएमसीने अधिक पाणीसाठा केला. यंदा २३ टीएमसी, तर गतवर्षी गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम सुरू करण्याच्या नियोजनातून केवळ १९ टीएमसी पाणीसाठा केला होता.

Kalammawadi Radhanagari Dam
Pearl Farming : आता शिवाजी विद्यापीठात पिकणार 'मोती'; प्राणीशास्त्र अधिविभागानं घेतला पुढाकार

पाणीसाठा दोन टीएमसीने जास्त

यंदा राधानगरीसह काळम्मावाडी व तुळशी धरणात मिळून जवळपास २० टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा १८ टीएमसी म्हणजे दोन टीएमसीने कमी होता. यातून संभाव्य पाणी तुटवड्याचे संकट आज तरी टळल्याचे स्पष्ट होते.

Kalammawadi Radhanagari Dam
जनावरांना 'ईअर टॅगिंग' 31 मार्चपर्यंत बंधनकारक; 1 जूननंतर टॅगिंगशिवाय खरेदी-विक्री राहणार बंद

तुलनात्मक साठा (2024)

धरण साठा (टीएमसी) टक्केवारी

  • राधानगरी ४.८९ ६२.९९

  • काळम्मावाडी १२.९२ ५४.९०

  • तुळशी २.१८ ६७.०८

  • २०२३

  • राधानगरी ५.१८ ६६

  • काळम्मावाडी १०.५३ ४३

  • तुळशी २.३५ ६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.