कोल्हापूर : शहरात पर्यटकांचा पूर; वाहतूक कोंडी सर्वदूर

शहरातील पार्किंगचे कागदावरचे नियोजनही उघडे पडले आहे.
kolhapur
kolhapursakal
Updated on

कोल्हापूर : बँकांना (bank)जोडून आलेल्या सुट्या, वर्षाखेर आणि रविवारची सुटी यामुळे आज शहरात पर्यटकांची(tourist), भाविकांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, पर्यटकांच्या वाढलेल्या वाहनांमुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीचा अनुभव आला. पार्किंगची अपुरी सुविधा, रस्त्याच्या दुतर्फा झालेली वाहनांची रांग यामुळे मुळातच अरुंद असणारे रस्ते आणखी छोटे झाले. शहराच्या सर्वच भागांत वाहतूक कोंडी(traffic jam) दिसली. शहरातील पार्किंगचे कागदावरचे नियोजनही उघडे पडले.

kolhapur
गुजरात : 400 कोटींचे हेरॉइन जप्त; पाकिस्तानी बोटीसह 6 जण ताब्यात

शहरातील आजचा रविवार हा पर्यटक दिवसच ठरला. सकाळी ७ वाजल्यापासूनच शहराच्या चारही बाजूंनी वाहने पर्यटक आणि भाविकांची वाहने येत होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिंदू चौक पार्किंममध्ये वाहनांची गर्दी झाली. शहरात पार्किंग व्यवस्था कोठे कोठे आहे याचे फलक नसल्याने पर्यटकांनी जागा मिळेल तेथे वाहने उभी केली. त्यामुळे अवजड वाहने, रिक्षा, चारचाकी वाहने रस्त्यातून जाऊ शकत नव्हती.

पर्यायाने शहराच्या मध्यवस्तीमध्ये जागोजागी वाहतूक कोंडी झाली. दिवसभर शहरातील वाहतूक रेंगाळलेली होती. अयोध्या टॉकीज ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजाराम रोड येथे दिवसभर पर्यटकांची गर्दी झाली होती. पुणे, सातारा, सांगली येथील कोकणात जाणारे पर्यटक शहरात थांबून अंबाबाईचे दर्शन घेऊन कोकणात जातात.

kolhapur
मुंबईत DRI ची कारवाई, १२५ कोटींचे हेरॉइन जप्त

बाजारपेठेत वर्दळ

हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठेत दिवसभर पर्यटक खरेदी करत होते. बऱ्याच दिवसांनी बाजारपेठेतील मरगळ झटकून गडबड, वर्दळ बाजारात पहायला मिळाली. फेरीवाल्यांकडेही पर्यटक वस्तू खरेदी करताना दिसत होते..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.