आजऱ्याजवळील रामतीर्थ परिसरात टस्कर हत्ती

Tusker Elephant In Ramtirtha Area Near Ajara Kolhapur Marathi News
Tusker Elephant In Ramtirtha Area Near Ajara Kolhapur Marathi News
Updated on

आजरा ः आजऱ्यातील रामतीर्थ परिसरात वावरत असलेला टस्कर हत्ती सुलगावनजीकच्या चोपडाईच्या जंगलात गेल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने त्याचा माग काढला आहे. दरम्यान, त्याने सोहाळे येथील चार शेतकऱ्यांच्या भात व ऊस पिकाचे नुकसान केले. हत्ती भादवण, पेरणोली परिसरात जाण्याची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे जाताना दक्षता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे. 

मसोली परिसरातील टस्कर शनिवार (ता. 10) सायंकाळी रामतीर्थ परिसरात दिसून आला. सोहाळे ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले. त्यांनी ही बातमी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने त्याच्यावर नजर ठेवली असून आज पहाटे तो वनविभागाच्या सुलगाव नर्सरीतून आजरा-गडहिंग्लज मार्ग ओलांडून चोपडाईच्या जंगलात गेला आहे.

त्याच्या पाऊलखुणा व विष्ठा पथकातील कर्मचाऱ्यांना आढळली. दरम्यान, त्याने पहाटे सोहाळे येथील नामदेव कोंडुसकर, सागर डोंगरे, पांडुरंग दोरुगडे व तुकाराम दोरुगडे यांच्या भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. तो खेडे गावातून पुन्हा पेरणोलीमार्ग मसोलीकडे जावू शकतो किंवा भादवण परिसराकडे जावू शकतो. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेताकडे जाताना पुरेशी दक्षता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने केले आहे. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.