गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश, सोनोग्राफी मशिनच्या पिशवीत सापडले हळदी-कुंक, लिंबू; बनावट डॉक्टर पसार

आरोग्य पथक व महिला बाल कल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला.
Pregnancy Test Racket Kolhapur
Pregnancy Test Racket Kolhapuresakal
Updated on
Summary

पोलिसांसमक्ष सोनोग्राफी मशिन (Sonography Machine) ताब्यात घेण्यात आले. सोनोग्राफी मशिनच्या पिशवीत हळदी-कुंक, लिंबू आढळून आले.

कोल्हापूर : वाशीनाका म्हाडा कॉलनीतील (Mhada Colony) एका घरात गर्भलिंग चाचणी (Pregnancy Test) करून देऊ, मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू, अशा भूलथापा लावत सोनोग्राफीद्वारे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होत होते. त्या घरात जिल्हा, शहर आरोग्य पथक व महिला बाल कल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला. यावेळी अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या वस्तू वितरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

Pregnancy Test Racket Kolhapur
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या चार केंद्रांना ठोकले टाळे; प्रशासनाची धडक कारवाई, मराठी भाषिकांत संताप

याप्रकरणी पोलिसांनी घरातून अमित डोंगरे व कृष्णात आनंद जासूद या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील डोंगरे घर मालक आहे. तो लॅब टेक्निशियनचे काम करतो. जासूद छाप्यावेळी घरातच सापडला. स्वप्निल पाटील नावाची आणखीन एक व्यक्ती मात्र पथक पोहोचताच तेथून निघून गेल्याचे समजते. तो बोगस डॉक्टर (Doctor) असल्याचेही सांगण्यात आले.

आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावारा, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांच्यासह डझनभर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या सहभागाने ही कारवाई झाली.

Pregnancy Test Racket Kolhapur
Love Affair Case : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून चाकूने भोसकून मित्राने केली मित्राची हत्या; तिघांना अटक

श्रीमती हासूरकर म्हणाल्या, ‘‘गर्भलिंग चाचणी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शोध घेतला असताना वाशीनाका परिसरातील म्हाडा कॉलनीतील एका घरात गर्भलिंग चाचणी होत असल्याचे समजले. त्यानुसार येथे येऊन माहिती घेतली असता एका घरात सोनोग्राफी मशिन आढळले. समितीच्या कार्यकर्त्यांनी एक महिला गरोदर असूनही तिची तपासणी होते का? याची खात्री करण्यासाठी गरोदर महिलेला तेथे पाठवले. त्या घरातील तिघा व्यक्तींनी या महिलेला मुलगा व्हायचा असल्यास कोंबडा खावा. तसेच रेड्याला जन्म दिलेल्या म्हशीचे दूध प्यावे, असे अचाट सल्ले दिले.

तसेच काही औषधांच्या गोळ्याही दिल्या. मुलगा हवा असल्यास उपचारांसाठी एक लाख रुपयांची मागणी केली.’’ हा सर्व प्रकार संशयास्पद होता. याचवेळी सोबतच्या आरोग्य पथकातील डॉ. वेदक, डॉ. भिसे यांनी वैद्यकीय चाचणी सोनोग्राफी विषयी दोघांना प्रश्न केले असता दोघांनीही संदिग्ध उत्तरे दिली. तेव्हा फसवेगिरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याचवेळी पोलिसांसमक्ष सोनोग्राफी मशिन (Sonography Machine) ताब्यात घेण्यात आले. सोनोग्राफी मशिनच्या पिशवीत हळदी-कुंक, लिंबू आढळून आले. अशा प्रकारचे साहित्य गरोदर महिलांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जागेवर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत डॉ. योगीता भिसे, डॉ. रूपाली यादव, डॉ. सुशील पाटील आदींनी सहभाग घेतला.

शेजारी-पाजारी अनभिज्ञच

गजबलेल्या वस्तीतील एका कोपऱ्यातील घरात पहिल्याच खोलीत फसवणुकीचा प्रकार घडत होता. त्याची माहिती शेजाऱ्यापाजाऱ्यांना नव्हती. आज आरोग्य विभागाचे पथक, बालकल्याण समितीचे सदस्य, पोलिस यांच्या गाड्या आल्यानंतर गल्लीतील लोक कुजबुज करून घटनेचा कानोसा घेत होते.

Pregnancy Test Racket Kolhapur
कोल्हापुरातून बाहेर जाणारे 2 लाख लिटर दूध 'गोकुळ'कडे वळवण्याचे आव्हान; 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण!

बांबवडेतील हॉस्पिटलची संशयावरून तपासणी

बांबवडे : अवैध गर्भपाताच्या संशयावरून येथील एका हॉस्पिटलची मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकारी सुप्रिया देशमुख यांनी काल रात्री तपासणी केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या हॉस्पिटलमध्ये आज शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. त्यानंतर दुपारपासून चाललेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या पथकात देशमुख यांच्यासह हर्षला वेदक, गौरी पाटील यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये बंद दारामागे पंचनामा व तपास सुरू होता. यात मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक सुनंदा गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.