राधानगरीजवळील अपघातात सख्खे भाऊ जागीच ठार; दोघांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने डोक्याचा झाला चेंदामेंदा

सुजल व सचिन मोटारसायकल (एमएच ०७- एक्यू- ९७४१) वरून राधानगरीतून गावी निघाले होते.
Accident on Radhanagari-Fonda Road
Accident on Radhanagari-Fonda Roadesakal
Updated on
Summary

मांडरेवाडी-शेळप दरम्यानच्या ओढ्याजवळ रस्त्यामध्ये त्यांच्या मोटारसायकलला अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिली असावी. शिवाय ते वाहन दोघांच्या डोक्यावरून गेले असावे. कारण दोघांच्याही डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

राशिवडे बुद्रुक : राधानगरी-फोंडा राज्य मार्गावर (Radhanagari-Fonda State Road) अभयारण्य क्षेत्रातील मांडरेवाडी-शेळप दरम्यान झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. सुजल चंद्रकांत राणे (वय २०) व सचिन चंद्रकांत राणे (२३, रा. राणेवाडी-बापार्डे, ता. देवगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अनोळखी वाहनाने ठोकरले, अशी नोंद राधानगरी पोलिस (Radhanagari Police) ठाण्यात झाली आहे.

काल सायंकाळी अपघात (Road Accident) झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुजल व सचिन मोटारसायकल (एमएच ०७- एक्यू- ९७४१) वरून राधानगरीतून गावी निघाले होते. राधानगरी-दाजीपूर दरम्यान मांडरेवाडी-शेळप दरम्यानच्या ओढ्याजवळ रस्त्यामध्ये त्यांच्या मोटारसायकलला अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिली असावी. शिवाय ते वाहन दोघांच्या डोक्यावरून गेले असावे. कारण दोघांच्याही डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

Accident on Radhanagari-Fonda Road
Rautwadi Waterfall : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! राऊतवाडी धबधब्याबाबत प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

त्यातच दोघा भावांचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि अभयारण्य यामुळे हा परिसर निर्जन असतो. घटनास्थळावर आसपास अन्य कोणतेही वाहन वा वर्दळ नसल्याने संबंधित वाहनचालक वाहन न थांबवता पसार झाला आहे. नातेवाईक यायला उशीर झाल्याने घटनेची रात्री उशिरापर्यत राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक संतोष गोरे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.