Kolhapur : सफाई कामगार महिलेशी अश्‍लील वर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम मारहाण; नातेवाइकांनी दवाखान्याची केली तोडफोड

Kolhapur Police Case : दवाखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

दवाखान्याची तोडफोड केल्याबाबत दीपा सोमय्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सफाई कर्मचारी महिलेसह तीन नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापूर : सफाई कामगार महिलेशी (Women) अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला डॉ. अतुल लक्ष्मीदास सोमय्या (वय ५५, रा. शाहू टोलनाका) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पीडित महिलांसह त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याने सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने पोलिसांनी (Kolhapur Police) रात्री उशिरा अटकेची कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.