बोरपाडळे (जि. कोल्हापूर)- माले (ता. पन्हाळा) येथे शेकोटी रस्त्यात पेटवल्याच्या आणि पूर्वीच्या रस्त्याच्या वादावरून सोमवारी रात्री ९ च्या सुमारास दोन गटात तलवारीसह लोखंडी पाईपस आणि गजाच्या वापराने झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. यातील तिगांची प्रकृती गंभीर आहे. ८ जणांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, माले येथील बिरोबा मंदिराजवळील सरकारी दवाखान्याजवळच्या दोन परिवारात पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद आहे. त्याचा रोष मनात ठेऊन हे परिवार एकमेकांशी बोलत नव्हते. हा वाद गावस्तरावर अनेकवेळा मिटवण्याचा प्रयत्न झाला. परंतु सोमवारी रात्री या परिवारांमध्ये रस्त्यात शेकोटी केल्याने व रस्त्यात गाडी अडवल्याने वाद उफाळून आला.
गणपती बाबू बादरे यांच्या फिर्यादीनुसार प्रताप शिवाजी बादरे याने रस्त्यावर शेकोटी पेटवली असता तुकाराम रंगराव वगरे आणि विकास तुकाराम वगरे यांनी रस्त्यात शेकोटी का केली? यावरून वाद घालून मारामारी केली. त्यानंतर बादरे परिवार वगरे परिवाराला जाब विचारावयास गेले असता तुकाराम वगरे हातात तलवार घेऊन व त्यांची दोन मुले विकास व राहुल हातात लोखंडी पाईप व गज घेऊन फिर्यादीच्या दारात जाऊन मारहाण केली. यामध्ये शिवाजी बाबू बांदरे, गणपती बाबू बादरे यांना हात-पाय, डोक्यावर वर्मी घाव लागल्याने शिवाजी बाबू बांदरे हे गंभीर जखमी झाले. गणपती बादरे यांच्या फिर्यादीनुसार तुकाराम वगरे, विकास व राहुल वगरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
विकास तुकाराम वगरे यांच्या फिर्यादीनुसार मी व वडील तुकाराम वगरे तेथून दुचाकीवरून जाताना पूर्वीचा राग मनात धरून आम्हाला अडवून काठी -लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात माझा भाऊ राहुल जखमी झाला. त्यामध्ये तुकाराम व विकास वगरे गंभीर जखमी झाले. विकास वगरे यांच्या फिर्यादीनुसार प्रताप शिवाजी बादरे, शिवाजी बाबू बादरे सचिन संभाजी बादरे, सोमनाथ गणपती बादरे, मोहन भीमराव बादरे यांच्या विरोधात तक्रार दाखल आहे. जखमींवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.