कोल्हापूर : दोन लाख जणांची लसीकरणास दांडी

लशीमुळे कोरोनापासून बचावल्या ९८ टक्के व्यक्ती
vaccination
vaccinationsakal
Updated on

कोल्हापूर : कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी जिल्ह्यात राबविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जवळपास ३१ लाख व्यक्तींनी पहिला डोस घेतला; तर २१ लाख व्यक्तींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी दोन हजार व्यक्तींना तिसऱ्या लाटेत कोरोना बाधा झाली. उर्वरित ९८ टक्के लस घेतलेल्या व्यक्ती कोरोनापासून वाचल्या आहेत. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी लस उपयुक्त असल्याचे उघड झाले आहे. असे असूनही जिल्ह्यात दोन लाख व्यक्तींनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. अशा व्यक्ती शोधून त्यांचे लसीकरण करण्याचे आव्हान लसीकरण विभागासमोर आहे.

vaccination
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

कोरोनाची भीती मनामनात आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखव, चव जाणे अशी लक्षणे दिसताच अनेकांना दवाखाना, उपचार खर्च, ॲडमिट झाल्यानंतर सोसावी लागणारी घालमेल आठवली. अनेकांच्या अंगावर काटा येतो. अशा व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वरदान ठरली. मोहिमेला पहिल्या महिन्यात लसीकरणास थंड प्रतिसाद होता. त्यानंतर मात्र लस घेणाऱ्यांचा उत्साह वाढला. गेल्या ११ महिन्यांत ३३ लाख ५०० व्यक्तींच्या उद्दिष्टापैकी ३१ लाख व्यक्तींनी कोरोनाचा पहिला डोस घेतला.

दीड महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. यात ओमिक्रॉनचे संकट आले. पुन्हा लसीकरणाला गर्दी सुरू झाली. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण नगण्य आहे, तर एकच डोस घेतलेल्या व्यक्ती काही प्रमाणात बाधित सापडल्या. लसच न घेतलेल्या तसेच व्याधिग्रस्त व्यक्ती बाधित सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

vaccination
वन नेशन-वन रजिस्ट्रेशन; जमिनीचे वाद आणि बनावट खरेदीपत्रं रोखण्यास होणार मदत

दोन्ही डोस झालेल्यांना कोरोना झाला तरी अवघ्या दोन-तीन दिवसांत लक्षणे कमी होऊन ते बरे झाले. पुढे दोन-तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर तेही कोरोनामुक्त झाले. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी कोणाला कोरोना होऊन ते कमी कालावधीत बरे झाले. ॲडमिट व्हावे लागले नाही. वेळ, पैसे, घालमेल व जीवाचा धोका टळण्यास मदत झाली. त्यामुळे लशीची उपयुक्तता उघड झाली आहे.

व्याधीग्रस्त नागरिकांना बूस्टर डोस

हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करना बूस्टर डोस (प्रिकॉशन) देण्यात येत आहे. याशिवाय, ६० वर्षांवरील व्याधिग्रस्तांनी असा बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे. अशा जवळपास ९५ हजार व्याधिग्रस्त व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येईल.

जिल्ह्यात दोन लाख व्यक्ती एकही डोस न घेतलेल्या आहेत. यांतील काही नोकरी, व्यवसायानिमित्त स्थलांतरित व्यक्ती, गरदोर माता, स्तनदा मातांपैकी काहींनी वैद्यकीय सल्ल्याअभावी डोस घेतलेला नाही, तर काही व्यक्ती गुंतागुंतीचे आजारपण किंवा घरातच बसून आहेत. अशांनी लस घेतली नसल्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यावी. काही शंका असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी.

- डॉ. फारूक देसाई, जिल्हा लसीकरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.