कोल्हापूरात रेल्वेच्या २ डब्यांना आग

रेल्वे स्थानकातील घटना, आग अाटोक्यात
कोल्हापूरात रेल्वेच्या २ डब्यांना आग
Updated on

कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू टर्मिनसमधील पार्किंग यार्डमध्ये उभ्या असणाऱ्या दोन नादुरुस्त डब्यांना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, डब्यांमधील आतील भाग जळून खाक झाल्याने सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले.या घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकातील पार्किंग यार्डमध्ये दोन नादुरुस्त डबे उभे होते. ते कोणत्याही रेल्वेला जोडलेले नव्हते.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक या डब्यांमधून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट येऊ लागले. त्यामुळे रेल्वे कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क केला. परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ कावळा नाका, महापालिका, कसबा बावडा येथून ३ फायर फायटर (बंब) आले. त्यांनी सुमारे १ तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी डब्यांमधील कोच, एसी आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तानाजी कवाळे, स्टेशन ऑफिसर कांता बांदेकर, चालक नवनाथ साबळे, रवींद्र बोडके, सुशांत पोवार, प्रमोद मोरे, अवधूत चव्हाण, विजय सुतार, संग्राम पाटील, शुभम कुंभार यांनी ही आग आटोक्यात आणली

चौकशी होणार

बंद डब्यांना नेमकी कशाने आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे तेथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरच आगीच्या कारणांचा खुलासा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.