खासदार धनंजय महाडिक यांनी नाट्यगृहाला आग म्हणजे घरात आग लागल्याची प्रत्येकाची भावना आहे, असे स्पष्ट केले.
कोल्हापूर : ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची (Keshavrao Bhosale Theatre) इमारत जशीच्या तशी वर्षभरात उभारली जाईल’, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या समितीस शासन मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात बैठक झाली.