Vande Bharat : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मिरज कृती समितीला ग्वाही

Vande Bharat : कोल्हापूर-मुंबई 'वंदे भारत' रेल्वे लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. मिरज रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षाने रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून ही मागणी केली होती.
Vande Bharat Railway
Vande Bharat Railwaysakal
Updated on

मिरज : बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ गाडी लवकरच धावणार आहे. याबाबत मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मुबई येथे भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्रासाठी सोयीची ठरणारी गाडी सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यावर रेल्वेमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत गाडी सुरू करण्याची ग्वाही मिरज रेल्वे कृती समितीला दिल्याची माहिती रेल्वे समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी दिली.

दरम्यान, हुबळी-पुणे आणि कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ सुरू झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देशामध्ये ‘वंदे भारत’ गाड्यांची सुरवात झाल्यापासून पुणे विभागावर रेल्वे कडून कायम अन्यायाची वागणूक देत ‘वंदे भारत’ सुरू केली होती. यासाठी रेल्वे कृती समितीच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी मुंबई येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कोल्हापूर-मिरज-सांगली-मुंबईदरम्यान वेगळी ‘वंदे भारत’ देण्याबाबत आग्रही मागणी केली.

त्यास रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावर तातडीने नवी गाडी देण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच कोल्हापूर-मिरज-मुंबई वेगळी ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होऊ शकेल. सध्या सुरू होणारी आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस हुबळी -मिरज-पुणे व कोल्हापूर-मिरज-पुणे ही रेल्वे आठवड्यातील सहा दिवस हुबळी-पुणे होऊ शकेल. कोल्हापूर-मिरज-मुंबई ही वेगळी ट्रेन होऊ शकेल. यामुळे या भागातील ‘वंदे भारत’ची मागणी लवकरच पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.