विषय काय? 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय'; कोल्हापुरात एकच चर्चा

सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल होत असल्याने लाईक आणि कमेंट येत आहेत.
Photo
Photoesakal
Updated on

कोल्हापूर - एखाद्या गोष्टीच्या प्रमोशनसाठी सध्या अनेक कल्पना लढवल्या जातात. अनेक आयडिया यासाठी वापरल्या जातात. बऱ्याच वेळा आपण सोशल मिडियावर अशा काही घटनांसंदर्भात वाचत असतो. प्रमोशन किंवा प्रसिद्धीसाठी अशा कल्पनांचा वापर केला जातो. मागील काही दिवसांपर्वी पुणे शहरातही काही पोस्टर झळकत होती. ‘शिवडे, आय एम सॉरी’ अशा पोस्टरने खळबळ माजवली होती. त्यांनंतर ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असे वाक्य लिहिलेल्या पोस्टरनेही सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले होते. त्याचप्रकारचा एक चिकटवलेलं लहान पोस्टर सध्या कोल्हापूर शहरातही झळकत आहे.

मात्र हे पोस्टर कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे. आम्ही पळून जाऊन लग्न केल आहे.. अशा आशयाच्या हे वाक्य एका कागदावर लिहून ते चिकटवण्यात आले आहे. लक्ष्मीपुरी येथील हा काय प्रकार असेल अशा पोस्टसह याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आता हा काय प्रकार असेल याची उत्सुकताही लागुन राहिली आहे. सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल होत असल्याने लाईक आणि कमेंट होत आहेत.

Photo
'पक्षाच्या आदेशानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पदांचा निर्णय होईल'

दरम्यान, लग्नाच्या बाबतीत लोकं सावधपणे पाऊलं उचलत असतात. खटपटी तर खूपच करतात. कारण आयुष्यातील तो महत्वाचा निर्णय असतो. काही लोकं अँरेंज मॅरेज (Arrange Marriage) करण्याला तर काही लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. पण या वाक्यामुळे तो फोटो खूप चर्चेत आला आहे. आम्ही पळून जाऊन लग्न केलयं, हा आता कोणत्या प्रमोशनचा तर पार्ट नाही ना? यावरूनही चर्चेला उधान आलंय.

Photo
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिनोम सिक्वेंसिंगच्या पाच लॅब ठप्प; काय घडलंय नक्की?

गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाने शहरभर होर्डिंग्ज लावच, त्या होर्डिंग्जवर मला अँरेंज मॅरेजपासून वाचवा असे लिहिले आहे. वर स्वत:चा फोटोही लावला होता. असा तर हा काही प्रकार असणार नाही ना याबाबात तर्कवितर्क जोडले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.