मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला (Shiva Art of War). या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
कोल्हापूर : सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (National Film Awards) येथील दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी (Director Sachin Balasaheb Suryavanshi) यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या ‘वारसा’ या महितीपटाला (Varsa Documentary) २०२२ चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. कला आणि सांस्कृतिक या विभागातून हा पुरस्कार जाहीर झाला असून, ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.