सणासुदीच्या तोंडावरच भाजीपाला खातोय 'भाव'; आवक थंडावली

vegetables
vegetablesesakal
Updated on
Summary

पेरूची आवक घटल्याने दर वाढत आहेत. दसऱ्याच्या तोंडावर जैसे थे असणारे फुलांचे दर समाधानकारक आहेत.

भाजीपाल्याची आवक पुन्हा थंडावल्याने भाव चांगलेच कडाडले आहेत. प्रतिकिलो दहा रुपयांवर आलेले टोमॅटोचे दर आता दुपटीने वाढले आहेत. इतर भाजीपाल्याच्या दरात सरासरी १५ रुपयांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचे दरही चढत्या मार्गावरच आहेत. सणासुदीच्या तोंडावर भाजीपाला भाव खात आहे.

कमी झालेले खाद्यतेल, कडधान्याचे दर स्थिर आहेत. फळबाजारात हंगामी फळांची आवक सुरू झाली आहे. हंगामी चिकूही दाखल होत आहे. प्रतीक्षेत असणाऱ्या काश्मिरी सफरचंदाची आवक वाढली आहे. सिमला सफरचंदाचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पेरूची आवक घटल्याने दर वाढत आहेत. दसऱ्याच्या तोंडावर जैसे थे असणारे फुलांचे दर समाधानकारक आहेत.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- ३० ते ४०, दोडका- ३० ते ४०, वांगी- ६० ते ७०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची- ४० ते ४५, फ्लॉवर- ५० ते ६०, कोबी- २० ते २५, बटाटा-२० ते २५, कांदा-३० ते ३५, लसूण-८० ते १००, आले- १८० ते २००, लिंबू- ३०० ते ३५० शेकडा, गाजर-४० ते ५०, बीन्स-५० ते ६०, वरणा शेंगा-४० ते ५०, भेंडी-४० ते ५०, काकडी- ४०ते ५०, गवार-५० ते ६०, कोथिंबीर २० ते २५,सर्व प्रकारच्या पालेभाज्या १५ ते २० रूपये.

खाद्यतेल : शेंगतेल-१८०, सरकी-१४५ ते १५०, सोयाबीन- १४५ते १५०, सुर्यफूल -१७० पामतेल- १४०.

फुले : केशरी झेंडू - १०, पिवळा झेंडू -१०, निशिगंध - ३० ते ४०, गुलाब - १००, शेवंती- ३०, गलांडा - १० ते २०, आष्टर- १००.

vegetables
सलग तिसऱ्या महिन्यात GST उत्पन्न १ लाख कोटींहून जास्त

फळे : विदेशी सफरचंद-१८० ते २००, देशी सफरचंद-१०० ते १५०, संत्री -१०० ते २००, मोसंबी-३० ते ५०, सिताफळ-३० ते ७०, डाळिंब-३० ते ७०, चिकू- ७०ते ८०, अंजीर- १४०, पेरु- ५० ते ७०, हनुमान फळ - १०० ते १२०, पपई- ५० ते ६०, कलिंगड - ३० ते ४०, राजा अननस-३० ते ४०, राणी अननस ७० ते ८०, मोर आवळा -१२० ते १५०, केळी- २५ ते ३० डझन, देशी केळी ५०ते ७० डझन, स्ट्रॉबेरी ५० रुपये तर किवी १०० ते १२०, ड्रॅगन १००-१२०, लेची चेरी- २५० बॉक्स.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी-२२ ते ३०, बार्शी शाळू- ३० ते ४५, गहू- २७ ते ३२, हरभराडाळ - ७५ ते ८०, तुरडाळ- १०० ते ११०, मुगडाळ- १०० ते १०५, मसूरडाळ-८५ ते ९०, उडीदडाळ- १०२, हरभरा-६८ ते ७२, मूग- ९५ ते १००, मटकी-११५ ते १४०, मसूर- ७५ ते ८५, फुटाणाडाळ- ८०, चवळी-८० ते१००, हिरवा वाटाणा- १३० ते १४०, छोला - ११० ते १२०.

vegetables
परमबीर देशाबाहेर पळाले असतील, तर त्यामागे भाजपाचा हात - काँग्रेस

खाऊच्या पानाचे सौदे ठप्प

सध्या विविध ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा परिणाम शहरातील बाजार समितीत होणाऱ्या खाऊच्या पानाच्या सौद्यावर झाला आहे. यामुळे कोकणात होणारी आवक या आठवड्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्नाटक सीमाभागातून होणारी खाऊच्या पानांची आवक बाजार समितीत पडून राहत आहे.

"भाजीपाल्याची आवक या आठवड्यात घटली आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. वाढती दराची झळ ऑक्टोबरअखेर जाणवू शकते."

- सागर मुसळे, भाजीपाला विक्रेते

vegetables
स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.