देशात सध्या ७५ हजार पशुवैद्यकांची गरज असताना सध्या केवळ ३६ हजारच पशुवैद्यक कार्यरत आहेत.
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या (Farmers) मुलांना पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण जिल्ह्यातच घेता यावे यासाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय (College of Veterinary and Dairy Technology) उभारणार आहे. यासाठी, शुक्रवारी (ता. ३०) होणाऱ्या संघाच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला सभासदांकडून मंजुरी घेतली जाणार आहे.