अनेकांच्या हृदयाचे चुकले ठोके ; विमानतळावर फायर मॉकड्रिलचा थरार 

Vibration of fire mock drill at kolhapur airport marathi news
Vibration of fire mock drill at kolhapur airport marathi news
Updated on

उजळाईवाडी (कोल्हापूर)  : उजळाईवाडी विमानतळावर सकाळी साडेदहा वाजता विमानाला आग लागली आणि विमानतळ थरारक रेस्क्‍यू मोहिम सुरू झाली. अग्निशमन दलाचे जवान अधिकारी डोळ्याचे पाते लवते न लवते तोच 'रिस्पॉन्स टाइममध्ये' आधुनीक क्रॅश फायर टेंडर (सीएफटी) या रोजनबेयर कंपनीच्या फायर फायटर व्हीईकलच्या फोमचा मारा करत आग विझवण्यास सुरू झाले. याचदरम्यान महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यंत्रणेसह दाखल झाले आणि आग विझवतच त्यांनी विमानातील 25 प्रवासी वाचविण्यासाठी कारवाई सुरू केली. हा प्रत्यक्ष घडलेला अपघात नसून या ठिकाणी आपत्तीत मदतकार्य कसे करावे, याचे मॉकड्रील झाले. 


आपत्तीतून ही 25 पैकी 23 प्रवाशांना वाचविण्यात यश मिळते व दोघांचा दुर्दैवी मृत्यू होतो. किरकोळ जखमी 13 प्रवाशांना प्रथमोपचार करण्यात आले, तीन प्रवासी सुखरूप घरी पाठविले. सर्वजणांनी मोहीम फत्ते झाल्याच्या आनंदात एकच जल्लोष सुरू केला. यावेळी अनेक रेस्क्‍यु टूल्सचा वापर केला. पावर ड्रीवन सॉं, हायड्रोलिक जनरेटरच्या वापराने स्प्रेडर आणि कटरद्वारे अडथळे दूर करत. वेगाने विमानाचा पत्राही कट केला. याचवेळी विमानतळावरील महाराष्ट्र सुरक्षाबल ,पोलीस दल , अॅस्टर आधार व अथायू हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी धावले. यावेळी विमानाचे काही प्रवासी दूरवर फेकले जातात. गंभीर जखमींना येथे आलेल्या तीन ऍम्बुलन्समधून तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवले. सर्व कारवाईचे विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून नियोजन केले. 

हेही वाचा- Inspiring: 11 मानाची पारितोषिके खेचून आणत शेतकऱ्याच्या मुलीने साकारले मोठे स्वप्न! रिव्हॉल्वर ऑफ हॉनर शुभांगीचा जीवनप्रवास
 विमानतळ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, उपनिरीक्षक दीपक शेळके, शिवाजी विचारे प्रदीप शिंदे, अग्नीशमन दलातील ए. एस. फनेपुरे, एस एच वानखेडे, सचिन निंबाळकर, मनोज चौधरी, एयरपोर्ट मॅनेजर विशाल भार्गव, कार्तिक भोईटे, अस्टर आधारचे आयेशा राऊत, वैभव पाटील, संदीप समुद्रे , महापालिका अग्निशमन दलातील दस्तगीर मुल्ला, गिरीश पवार , रमेश जाधव, अभय कोळी, विशाल चौगुले, आकाश जाधव, अथायु हॉस्पिटलचे डॉ. पुनम पाटील,डॉ. शितल मोहकर, डॉ. अफरीन कागवाडे यांनी सहभाग घेतला. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.